IND v/s ENG : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, ‘हा’ खेळाडू ठरला विजयाचा शिल्पकार

0

चेन्नई : येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय मिळविला. सर्वच प्रकारात सर्वोत्तम खेळ करीत भारताने इंग्लंडचा आशियातील विजयरथ रोखला. इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अखेरपर्यंत सावरू शकले नसल्याने, भारताने मोठ्या फरकाने विजय संपादन केला. पर्दापणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी रविचंद्रण अश्विन या जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांना अखेरपर्यंत सावरून दिले नाही. या दोघांच्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. या कसोटीत अष्टपैलू कामगिरी करून टीकाकरांचे तोंड बंद करणारा आर. अश्विन मॅन ऑफ द मॅच ठरला.

४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या १६४ धावाच करू शकला. इंग्लंडचे दिग्गज फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकले नाही. परिणामी भारताने ३१७ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. या विषयासह भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान, लागोपाठ सहा सामन्यात विजय संपादन करणारा इंग्लंडच्या संघाचा विजयीरथ आशिया खंडात भारताने रोखला. याआधी जो रुटच्या नेतृत्वाली इंग्लंड संघानं श्रीलंका आणि भारताचा पराभव केला होता. चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यात भराताचा पराभव करत जो रुट यानं आशिया खंडात विजयी षटकार लगावला होता. जो रुटनं श्रीलंकेला पाच आणि भारतीय संघाला एक वेळा पराभूत केलं आहे. त्यानंतर सातव्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामान्यात प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन राहित शर्माने १६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला उपकर्णधार अजिंक्य राहणेनी चांगलीच साथ दिली. रोहितच्या या शेतकी खेळीच्या जोरावर भारताने ३२९ धावा उभारल्या. त्यानंतर फलंदाजीलाआलेल्या इंग्लंड संघाचे मात्र आर. अश्विनने कंबरडेच मोडले. पहिल्या डावात त्याने पाच बळी टिपले. त्यानंतर दुसऱ्या डावा शतकी खेळी करतानाच तीन बळीही टीपले. अश्विनने सामन्यात आठ बळी घेताना फलंजातीही छाप पाडली. तर अक्षर पटेल यानं दुसऱ्या डावांत अचूक टप्यावर मारा करत पाच बळी घेण्याची किमया साधली आहे. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत दोन आणि दुसऱ्या डावांत पाच बळी घेत सामन्यात सात बळी मिळवले आहेत. कुलदीप यादव याला दोन बळीवर समाधान मानवं लागलं. ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यानं पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावांत विराट कोहलीनं महत्वाची अर्धशतकी खेळी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.