India V/s England : टीम इंडियाचे शिलेदार मैदानात; क्वारंटाइन टाइम संपला!

तिन्ही चाचण्या निगेटीव्ह

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : सोमवारपासून (दि.५) इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात होत असून, टीम इंडियाच्या शिलेदारांनी मैदानात चांगलाच खाम गाळला. तिनही कोरोना चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर खेळाडूंचा क्वारंटाइन टाइम संपला. त्यानंतर खेळाडूंनी मैदानात उतरत कसून सराव केला आहे. ५ फेब्रुवारीला दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पहिला सामना खेळविला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियात जबरदस्त यश मिळविल्यानंतर टीम इंडिया चांगलीच जोशात आहे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर रजेवर गेलेला कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात परतल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोराना संकटानंतर भारतीय संघ मायदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळणार आहे. त्यामुळे सर्वांनाच  या मालिकेबाबत उत्सुकता असून, टीम इंडिया जोरदार यश मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, २०२० च्या सुरवातीलाऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आला होता. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आणि त्यानंतरची मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका रद्द करावी लागली होती.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.