IND v/s ENG : पहिल्या डावात भारताच्या ३२९ धावा, इंग्लंडचा डाव गडगडला, भारताची भेदक गोलंदाजी!

इंग्लंडचा डाव अडचणीत आला आहे.

0

चेन्नई : भारताचा हिटमॅन रोहित शर्माच्या दीड शतकी कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. त्याचा पाठलाक करायला मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४१ धावा केल्या होत्या. फिरकीपटू आर. अश्विनने भेदक गोलंदाजी करीत इंग्लंडच्या दोन फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखविला. एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेल्याने इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. 

दरम्यान, कसोटीच्या दुसरा दिवस पूर्णपणे गोलंदाजांनी गाजविला. सकाळच्या सत्रातच आठ गडी बाद झाल्याने, पुढील तीन दिवस गोलंदाजांचेच असतील असेच काहीसे चिन्हे आहेत. भारताचे उर्वरीत चार फलंदाज बाद झाल्यानंतर इंग्लंडचेही चार फलंदाज तंबुत परतले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्माने रॉरी बर्न्स याला पबाद करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर आर. अश्विनने सिब्ली आणि लॉरेन्स यांना बाद केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कसोटीतून पर्दापण करणाऱ्या अक्षर पटेलने पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाचा तारणहार ठरलेल्या कर्णधार जो रूटला बाद करीत इंग्लंड संघाला मोठा हादरा दिला.

पहिल्या दिवशी रोहित शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या दमदार फलंदाजीनंतर दुसऱ्या दिवशी अक्षर पटेल झटपट बाद झाला. त्यानंतर लागोपाठ गडी बाद होत गेल्याने, दुसऱ्या दिवशी भारतला केवळ २९ धावाच काढता आल्या. एका बाजूला ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करीत अससताना, दुसरीकडे मात्र संधी फलंदाजी सुरू होती. पहिल्या दिवशी ३३ धावा पूर्ण करणाऱ्या ऋषभने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे भारताला ३२९ धावांचा टप्पा गाठता आला. तर दुसरीकडे इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीने सर्वाधिक चार बळी घेत भारतीय गोलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात रोखले. तर वेगवान गोलंदाज ओली स्टोन याने तीन बळी घेतले. याशिवाय जॅक लीच याला दोन तर कर्णधार जो रुटला एक गडी बाद करता आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.