पँगाँगमधून चीन मागे हटला, देप्सांगचे काय?, भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोदी सरकारला घरचा आहेर!

0

लोकराष्ट्र : भारत चीन सीमेवर निर्माण झालेली युद्धजन्य स्थिती आता काहीशी कमी होत आहे. चीनने अचानक माघार घेतल्याने हा संघर्ष तुर्तास निवळताना दिसत आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात आमने-सामने उभे ठाकलेले भारतीय व चीनी सैन्य आता माघारी परतत आहेत. पँगाँगमधील सैन्य चीनने पूर्णपणे माघे घेतल्याने, परिस्थिती आता निवडताना दिसत आहे. यात भाजप सरकारची योग्य निती कामी आल्याची चर्चाही जोरदार रंगत आहे. मात्र भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामीयांनी पँगाँग सरोवर परिसरातील सैन्य माघारीचा हवाला देत अससतानाच देप्सांग परिसरात चीनने अख्खे गावच उभारले असून, हे चीन केव्हा उठविणार असा मोदी सरकारला सवाल केला आहे.

गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर चीनने आपले लष्कर पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात तैनात केले होते. याठिकाणी चीनकडून सातत्याने घुसखोरी केली जात असल्याने येथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. बऱ्याचदा चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला असता, भारतीय सैन्याने तो हाणून पाडला होता. मात्र अचानकच चीनी सैनिक या परिसरातून माघारी परतत असल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. यामागे भारताची निती कामी आल्याचे बोलले गेले. कारण या काळातभारत आणि चीन यांच्या लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू होती.

अखेर मागील आठवड्यात चर्चेला यश आलं. दोन्ही देशांनी पँगाँग सरोवर परिसरातील लष्कर मागे घेण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर पँगाँगमधील लष्कर चीननं मागे घेतलं आहे. या सगळ्या घटनेनंतर स्वामी यांनी ट्विट करत मोदी सरकारला सवाल केला आहे. चीन व भारताने पँगाँग सरोवर परिसरातून पूर्णपणे सैन्य मागे घेतल्याचं काही माध्यमांनी घोषित करून टाकलं आहे. म्हणजेच जूनमध्ये भारतीय लष्कराने एलएसी पार केले होते. ते ठिकाण आपण सोडले आहे. पण, देप्सांगच काय, जिथे चीनच्या लष्कराने छावण्या उभारल्या आहेत? शांतता,” असा सवाल स्वामी यांनी मोदी सरकारला केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.