IND v/s ENG : इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर आटोपला तर रोहितच्या अर्धशतकाने भारताचा डाव सावरला

रोहितने एकाकी झुंज देत आपले अर्धशतक पूर्ण केले, तो नाबाद ५७ धावांवर खेळत आहे

0

अहमदाबाद : डे-नाईट खेळविल्या जाणाऱ्या भारतविरुद्ध इंग्लंड संघादरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी अनेक घडामोडी घडल्ये. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ अवघ्या ११२ धावांवर गारद झाला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा नेटाने सामना केला. मात्र अशातही भारताची ३ बान ९९ धावा अशी स्थिती झाली. दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाची भारतीय गोलंदाज अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी दाणादाण उडवून दिली. अक्षर पटेल ६ तर अश्विनने ३ गड्यांना माघारी धाडत इंग्लंडचा डाव ११२ धावांवर आटोपण्यात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावित ५७ धावांची नाबाद खेळी केली. तर अजिंक्य रहाणे १ धाव काढून नाबाद आहे.

चार सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने पहिली तर भारताने दुसरी कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी समान कामगिरी केली आहे. त्यामुळे दुसरी कसोटी दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाची असल्याने विजयाच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरले. दिवस -रात्र खेळविल्या जाणाऱ्या या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेकजिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकाही फलंदाजाला छाप पाडता आली नाही. डॉम सिबली आणि जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाले. सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक केलं. कर्णधार जो रूट (१७) स्वस्तात बाद झाला. जॅक क्रॉली अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (६), ओली पोप (१), जोफ्रा आर्चर (११), जॅक लीच (३) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३) सारेच स्वस्तात बाद झाले.

इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय फलंदाजीही काहीशी अळखळतच झाली. भारतीय फलंदाजांनी संथ गतीने सुरुवात करताना विकेट वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ५१ चेंडूत ११ धावा करणारा शुभमन गिल स्वस्तात बाद जाला. त्यानंतर संकटमोचन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला भोपाळाही फोडता आला नाही. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फारसे यश आले नाही. बचावात्मक फटका मारण्याच्या नादात तो २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. भारताच्या एकापाठोपाठ एक विकेट जात असताना रोहित शर्माने मात्र दुसऱ्या बाजुने चांगली खेळी केली. त्याने ६१ चेंडून  आपले अर्धशतक साजरे केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मैदानावर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे नाबाद खेळत होते.

दरम्यान, वेगवान गोलंदाजाला फायदेशीर ठरणाऱ्या या खेळपट्टीवर भारताने संघात केवळ दोन बदल केले. सिराजच्या जागी बुमराहला संघात स्थान दिले. तर कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर संघात आला. दुसरीकडे इंग्लंडने संघात चार बदल केले. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्रॉली या चौघांना संघात स्थान देण्यात आले. तर जो बर्न्स, लॉरेन्स, स्टोन आणि मोईन अली यांना संघातून वगळण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.