‘या’ गोलंदाजाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टाकली नांगी, १३४ धावांत इंग्लंडचा डाव गुंडाळला!

0

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड संघाच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघ पराभवाच्या छायेत उभा आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा पराभव करणाऱ्या इंग्लंड संघ दुसऱ्या कसोटीत मात्र सपशेल शरणागती पत्कारताना दिसत आहे. पहिल्या डावा भारतीय संघाने ३२९ धावा काढल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंड संघ अघ्या १३४ धावात गुंडाळला गेला. भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या ‘पंच’ने इंग्लंड संघाला अखेरपर्यंत सावरता आले नाही. परिणामी इंग्लंडचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. त्यामुळे भारताकडे १९५ धावांची भक्कम आघाडी असून, दसऱ्या डावात  भारत एक बाद ५४ धावांवर असून, भारताकडे आता २४९ धावांची आघाडी आहे. 

दुसऱ्या दिवशी भारताचे चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर, आघाडीच्या इराद्याने इंग्लंड संघ मैदानात उतरला. मात्र फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सुरुवातीपासूनच इंग्लंड संघाला झटके दिले. त्यामुळे अखेरपर्यंत इंग्लंडचा संघ सावरू शकला नाही. अश्विनने पाच बळी घेत भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स शुन्यावर बाद झाल्यानंतर डॉम सिबली (१६) आणि डॅन लॉरेन्स (९) या दोघांना अश्विनने बाद केले. आजच्या दिवसाचे सर्वात आकर्षण ठरले ते कसोटीत पर्दापण करणाऱ्या अक्षर पटेल याचे. त्याने फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटला (६) स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या. पण, त्यांनादेखील खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आले नाही. मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) हेदेखील स्वस्तात बाद झाले. नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. अश्विनने ५, अक्षर पटेल आणि इशांत शर्माने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी घेतला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.