IND v/s ENG : भारत विजयाच्या उबरठ्यावर, रविचंद्रन अश्विनचे दमदार शतक

४५२ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली

0

चेन्नई : पहिल्या डावापासूनच सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीतील विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने झळकावलेल्या संयमी शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ४८२ धावाचे बलाढ्य आव्हान ठेवले. मात्र तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ३ बाद ५३ धावा अशा दयनीय स्थितीत असल्याने, सकाळच्या सत्रातच भारत आपला विजय साजरा करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. 

दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव १३४ धावात संपुष्टात आल्यानंतर भारताकडे १९५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात अश्विनच्या संयमी शतकाच्या जोरावर २८६ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडसमोर ४८२ धावांचे बलाढ्य आव्हान होते. मात्र इंग्लंडचे प्रमुख फलंदाज दुसऱ्या डावातही ढेपाळल्याने ३ बाद ५३ अशी दयनीय अवस्था इंग्लंडची झाली आहे. दरम्यान, गोलंदाजीला अनुकुल असलेल्या या खेळपट्टीवर भारताचे प्रमुख फलंदाज दुसऱ्या डावात स्वस्तात तंबुत परतले. मात्र फिरकीपटू अश्विनने संयमी आणि अष्टपलू खेली करत दमदार शकत झळकविले. कर्णधार विराट कोहलीने त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. या दोघांनीही इंग्लंडच्या फिलकीपटूंचा धैर्याने सामना केला.

आता सामन्यातील दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून, इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे. तर भारताला विजयासाठी ७ गड्यांची आवश्यकता आहे. ४८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिबली (३) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पाठोपाठ रॉरी बर्न्सदेखील २५ धावांवर अश्विनचा बळी ठरला. तर नाईट वॉचमन जॅक लीच शून्यावर बाद झाला. त्याने अक्षरला आपली विकेट बहार केली. सध्या डॅन लॉरेन्स ९९ धावांतर तर जो रूट २ धावांवर खेळत आहे.

कसोटीचा संक्षिप्त आढावा…

भारत पहिला डाव सर्वबाद ३२९ धावा (रोहित शर्मा -१६९, मोईन अली १२८/४

इंग्लंड पहिला डाव – सर्वबात १३४ (बेन फोक्स – ४२, अश्विन ४३/५)

भारत दुसरा डाव – सर्वबाद २८६ (अश्विन १०६, मोईन अली ९८/४)

इंग्लंड दुसरा – डाव ३ बाद ५३ (रॉरी बर्न्स २५, अक्षर पटेल १५/२)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.