IND v/s ENG : सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी, मात्र ‘ही’ असेल अट!

५ फेब्रुवारीपासून भारत विरूद्ध इंग्लड मालिका रंगणार

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : ऑस्ट्रेलियात जबरदस्त यश प्राप्त केल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर भारतीय क्रिकेट संघ घराच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. ५ फेब्रुवारीपासून भारत इंग्लविरूद्ध ४ सामा्यंची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यातील पहिले दोन सामने चेन्नईला तर उर्वरीत दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. आनंदाची बातमी अशी की, अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या सामान्यांबरोबरच चेन्नईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामान्यासाठी प्रेक्षकांना हजेरी लावता येणार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 

बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार भारत विरूद्ध इंग्लड दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चिन्नस्वामी स्टेडियममध्ये ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे. तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.  त्याशिवाय, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील सामना कव्हर करण्यासाठी स्टेडियममध्ये परवानगी दिली जाणार असून त्यांची बसण्याची व्यवस्था प्रेस बॉक्समध्ये असणार आहे.

दरम्यान, कोरोनाबाबत केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक नियमावली दिली असून, त्यानुसार मैदानी खेळांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत आम्ही हा निर्णय दिल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ५० टक्के आसनक्षमता उपलब्ध करून दिल्याने, मोजक्याच क्रिकेटप्रेमींना मैदानात जावून कसोटी सामन्याचा आनंद घेता येणार असल्याचेही त्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.