पिंपरी चिंचवड : आपमध्ये जोरात इनकमिंग; भाजप आणि आरपीआयला मोठा धक्का

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे

0

पिंपरी : प्रतिनिधी

सध्या महापालिकांची प्रभागरचना जाहीर झाली आहे. अजून आरक्षण सोडत आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर होणं बाकी आहेत. मात्र अशातही सर्वत्र महापालिका निवडणुकीचा जोर वाढताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडसह पुणे महापालिकेत तर फोडाफोडाची राजकारणाला वेग आला आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर आम आदमी पक्ष अर्थात आप आहे. आपने पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांची फोडाफोड केली असून, सध्या आपमध्ये जोरात इनकमिंग सुरू आहे.

आप मैदानात उतरल्याने पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजप व माजी सत्ताधारी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी, भाजपच्या सांगवी या शहरातील बालेकिल्यातील व पक्षाचे आमदार व शहराचे कारभारी असलेल्या लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील प्रभाग उपाध्यक्ष सुरेंद्र कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत आपचे पारडे जड झाले आहे. त्यांच्याबरोबर आरपीआयच्या जुन्या कार्यकर्त्या अनिता कांबळे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसोबत आकुर्डी येथील आपच्या पक्ष कार्यालयात पक्षाचा झेंडा हाती घेतला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष वाहाब शेख, शहराध्यक्ष यशवंत कांबळे, शहर सचिव किशोर जगताप, संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाठ, प्रचार प्रमुख राज चाकणे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष मंगेश आंबेकर तसेच अशोक तनपुरे, विजय अब्बाड, सरोजनी कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.