राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा; पत्नीशी बोलण्याचा करतात प्रयत्न!

चाहत्यांचा आशिर्वाद आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे

0

दिल्ली : लोकराष्ट्र वृत्तसेवा

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव मागील २० दिवसांपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने, राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू असून, मधल्या काळात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र चाहत्यांचे आशिर्वाद आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे त्यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होताना दिसत आहे.

राजू यांचे पीए अजीत सक्सेना यांनी ही माहिती दिली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या हातापायात हालचाल होत आहे. ते डोळे उघडून आपल्या बायकोकडे पाहत आहेत. इतकंच नाही ते त्यांच्या हाताला स्पर्श करुन मी लवकरच बरा होतोय असं सांगतानाही दिसत आहे. अजीत सक्सेना यांनी पुढे म्हटलंय, राजूच्या प्रकृतीत फार जलद गतीनं सुधारणा होत आहे. मागचे 27 दिवस ते रुग्णालयात आहेत. मध्यंतरी त्यांची प्रकृती बिघडली होती. पण आता ते रिकव्हर होत असून लवकरच ते पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी परतणार आहेत हे नक्की.

फक्त पत्नीला भेटायची परवानगी

राजू यांना कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. अजीत सक्सेना यांनी सांगितलं, डॉक्टरांनी केवळ राजू यांच्या पत्नीलाच त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या पत्नी शिवाय इतर कोणालाही आत जाण्यास परवानगी नाही. राजू आता त्यांच्या हाता पायाची हालचाल करत आहे. त्याच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होईल.

१० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जीम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताच त्यांची एंजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णालयात दाखल केल्यापासून बेशुद्ध असलेल्या राजू श्रीवास्तव यांची एंजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांना शुद्ध आली नाही. त्यानंतर त्यांच्या मेंदूमधील एक नस डॅमेज झाल्याचं समोर आल्यानं त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आला. त्यांना सातत्यानं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होऊ लागल्यानं सर्वांना दिसाला मिळाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.