बाबा रामदेव यांच्या Coronil औषधाला मान्यता नाहीच, ‘तो’ दावा खोटा, आयएमए आक्रमक!

यासर्व प्रकरणावरून आता आयएमए आक्रमक झाली आहे.

0

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनील हा बहुचर्चित औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी पूर्णत: खोटी असल्याचे स्पष्टीकरण इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने सोमवारी दिले आहे. कोरोनील हे औषध कोविड-१९ च्या उपचारावर प्रभावी असल्याचा दावा पंतजलीकडून करण्यात आले होते. मात्र अद्यापयर्पंत एकाही आयुर्वेदीक औषधाला कोविडवर उपचारासाठी परवानगी दिली नसल्याचे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. आता यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

पंतजली आयुर्वेदने गेल्या १९ फेब्रुवारी रोजी डब्ल्यूएचओ सर्टिफिकेशन योजनेत कोरोनल औषधाला कोविड-१९ च्या उपचारासाठी आयुष मंत्रालयाने प्रमाणपत्र दिल्याचे सांगितले होते. मात्र हे सर्व खोटं असल्याचे आता समोर आले आहे. पंतजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट करून म्हटले होते की, ‘कोरोनासाठी आम्हाला डब्ल्यूएचओ जीएममी अनुपालन सीओपीपी प्रमाणपत्र भारत सरकार डीजीसीआय यांनी दिले होते. मात्र डब्ल्यूएचओने असे कोणतेही औषध मंजूर केले नसल्याचे स्पष्ट आहे. जगभरातील नगारिकांच्या उज्वल भविष्यासाठी डब्ल्यूएचओ काम करते’ असा खोचक टोलाही त्यांनी आपल्या ट्विटमधून हाणला.

दरम्यान, यासर्व प्रकरणावर देशाचे आरोग्यमंत्री या नात्याने खोट्या दाव्यावर आधारीत औषधाला मान्यता देणे किती न्यायसंगत आहे? असा प्रश्न सोमवारी आयएमएने जारी केलेल्या निवेदनात उपस्थित केले आहेत. अशा अँटी-कोरोना उत्पादनाच्या तथाकथित क्लिनिकल ​​चाचणीसाठी आपण कालावधी ठरवू शकता का? असेही त्यात म्हटले आहे. आयएमए म्हणाले, देशाला मंत्र्यांकडून स्पष्टीकरण हवे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल मेडिकल कमिशनलाही आयएमए पत्र लिहणार आहे. हे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन आहे. डब्ल्यूएचओने प्रमाणपत्र दिल्याचा खोटेपणा पाहून इंडियन मेडिकल असोसिएशनला धक्का बसला असल्याचे आयएमएने म्हटलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.