‘‘सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे’’, भोंग्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंचा इशारा!

४ तारखेचा अल्टिमेटम; हनुमान चालिसा लावण्याबाबत पुन्हा इशारा

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

औरंगाबाद : “संपूर्ण देशातील हिंदूंना माझी विनंती आहे की मागचा पुढचा अजिबात विचार करू नका, हे भोंगे उतरलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरलेच पाहिजे. ते भोंगे मंदिरांवरील असले तरी उतरवलेच गेले पाहिजे, पण मशिदींवरील भोंगे उतरल्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवले जातील, त्यामुळे भोंगे उतरवण्याबाबत मुस्लिम समाजाने समजून घेण्याची गरज आहे. जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे’’, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.

READ ALSO : भोंग्याच्या मुद्यावर बोलत असतानाच सुरू झाली अजान; राज ठाकरेंनी संतापून, ‘‘आताच्या आत्ता…’’

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ३ तारखेपर्यंतची मुदत दिली. ३ तारखेनंतर जर भोंगे उतरविले गेले नाही, तर ४ तारखेपासून मशिदीच्या समोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावा, असेही राज ठाकरेंनी आवाहन केले. भोंग्यांच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘‘उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही. सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, स्थानिक पोलीस ठाण्यात विचारल्याशिवाय लाऊडस्पीकर लावू शकत नाही. किती मशिदींकडे परवानगी आहे? संभाजीनगरमध्ये ६०० मशिदी असल्याचे मला काल सांगितले. असे फक्त संभाजीनगरमध्ये नाही तर देशभरात आहे. संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर खाली आले पाहिजेत. प्रत्येक वेळा आम्हीच का भोगायचे.

READ ALSO : Live : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा पाहा इथे

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘‘लाऊडस्पीकरचा विषय कधी काढायचा नाही का? लाऊडस्पीकर हा काही नवीन विषय नाही. याआधी अनेकांनी हा विषय मांडला आहे आणि मी फक्त त्याला पर्याय दिला आहे. लाऊडस्पीकर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल तर मशिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावू. महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल घडवायच्या नाहीत. मुस्लिम समाजाने ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे.’’

READ ALSO : अल्टिमेटम वगैरे शब्द मी… सुप्रिया सुळेंची राज ठाकरेंवर टीका!

आम्हाला सभा घ्यायची असली की हा शांतता क्षेत्र असल्याचे सांगतात. इथे रात्रीची कुठली शाळा भरते. यांना कुठेही परवानगी मिळते. रस्त्यावर येऊन नमाज पडण्याची परवानगी कोणी दिली? असा सवालही राज यांनी याप्रसंगी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ही एकदा दाखवावीच लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी याप्रसंगी दिला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.