बीएच सिरीज असेल तर देशात कुठेही चालवता येणार वाहन

ज्यांची कार्यालये देशाच्या किमान चार राज्यांत आहेत, असे अधिकारी व कर्मचारी ज्यांच्याकडे वाहन आहेत अशा वाहनांसाठी बीएच सिरीजमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

देशात विविध ठिकाणी नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली झाल्यानंतर वाहनांची संबंधित राज्यात नोंदणी करणे अनिवार्य असते. मात्र आता केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालय, केंद्रीय विभाग आणि ती खाजगी किंवा निमशासकीय कार्यालये, लष्कराचे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याव्यतिरिक्त, ज्यांची कार्यालये देशाच्या किमान चार राज्यांत आहेत, असे अधिकारी व कर्मचारी ज्यांच्याकडे वाहन आहेत अशा वाहनांसाठी बीएच सिरीजमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारत सिरीज घेतल्यानंतर वाहनमालकाला दुसऱ्या राज्याचा नोंदणी क्रमांक घ्यावा लागणार नाही. खासगी किंवा निमशासकीय नोकऱ्या करणाऱ्यांना देशातील किमान चार राज्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेले वाहनमालक बीएच सिरीजसाठी अर्जास पात्र असतील.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहने नोंदणीसाठी भारत सिरीज उपलब्ध करून दिली आहे. ऑगस्ट महिन्यात याबाबत अधिसूचना काढली आहे. ही सिरीज घेण्याचा पहिला मान ऋषिकेश पंढरीनाथ गायकर यांना मिळाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीएच सिरीजच्या पहिल्या वाहनाची नोंदणी करण्यात आली आहे.

काय आहे बीएच सिरीज

भारत सिरीज बीएचमध्ये नोंदणी झालेल्या वाहनांना सुरुवातीचे दोन आकडे हे नोंदणीचे वर्ष दर्शविते. यानंतर बीएच अाणि त्यापुढे चार आकडी वाहन क्रमांक आणि शेवटी एए, एबी अशा स्वरूपाची वाहनाची नंबरप्लेट असेल. या सिरीजच्या वाहनांना स्वतंत्र पासिंग करण्याची गरज नाही. स्थानिक आरटीओ कार्यालयात नोंदणी कराची रक्कम एकदाच भरून १५ वर्षांकरिता वाहनाला परवाना दिला जातो. मात्र, बीएच सिरीजमध्ये सुरुवातीच्या दाेन वर्षांसाठी नोंदणी होणार अाहे. पुढे ज्या राज्यात वाहन असेल त्या राज्याच्या नियमानुसार पुनर्नाेंदणी करावी लागेल

अर्ज असा करावा

संबंधित वाहनचालक प्रथम पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उतिर्ण झाल्यानंतर बीएच सिरीजसाठी अर्ज करता येईल. प्रथम केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवर ऑनलाइन लॉगइन करून अर्ज भरावा लागले. तसेच नवीन वाहन खरेदी करताना संबंधित वाहन वितरकाला मालकाच्या वतीने व्हॅन पोर्टलवर उपलब्ध फॉर्म २० भरून द्यावा लागेल. याकरीता गाडीच्या किमतीनुसार टॅक्स भरावा लागणार अाहे. १० लाखांसाठी ८ टक्के, १० ते २० लाख १० टक्के, २० लाखांच्या पुढे १२ टक्के कर भरावा लागणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.