महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्यास ठाकरे सरकार अल्पमतात; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा!

भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला

0

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. १० जागांसाठी ११ उमेदवार उभे झाल्याने या निवडणुकीत अधिक चुरस बघायला मिळाली. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडूनही विजयाचा दावा केला जात आहे. मात्र, अशा वेळी भाजप नेते मोहित कंबोज यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेतही महाविकास आघाडीला धक्का बसणार का? असं झालं तर महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वावरच गंडांतर येण्याची शक्यताही दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

‘विधान परिषद निवडणुकीसाठी आज २८५ मतदान झाले. सरकार बनवण्यासाठी जादुई आकडा १४३ आहे. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा वेळी उद्धव ठाकरे सरकारला किती मतं पडणार ते पाहू. आज उद्धव ठाकरे यांचं रिपोर्ट कार्ड येणार!’ असे सूचक ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत लागणारी मते नसतानाही भाजपचे तिसरे धनंजय महाडिक विजयी झाले होते. त्यांच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले असल्याचे म्हणाले होते. ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही. त्यांच्यावर आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी १४५ मते लागतात. त्यामुळे आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.