मुदतीआधीच मुदत ठेवी मोडण्याची वेळ आल्यास…?

0
कोरोना मुळे किंवा इतर काही कारणांनी एफडी (Premature) मोडायची वेळ आली  तर? हा विचार सध्या अनेकांच्या मनात येत आहे. अशात काय करावे याबाबती माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. साधारणत: खालील मुद्यांच्या आधारे तुम्हाला तुमच्या शंकांचे उत्तरे मिळतील.
१) मुदत ठेवी मोडण्याऐवजी एफडीच्या अगेन्स्ट कर्ज (Loan Against FD) घ्यायचा पर्याय स्वीकारावा.  एफडीवर घेतलेल्या कर्जाचा व्याजदर साधारणपणे त्या एफडीवरील व्याजदराच्या एक ते दोन टक्के अधिक असतो. अर्थात बँकेनुसार तो वेगवेगळा असतो. पर्सनल लोन घेण्यापेक्षा  एफडीवरील कर्जाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो,  कारण एफडीवरील कर्जाचे व्याजदर पर्सनल लोनच्या व्याजदरापेक्षा साधारणतः कमी असतात व ते त्वरित होते. कारण त्यांना ठेवींची सुरक्षितता असते.
२) स्वीप-इन (Sweep In) एफडी अकाउंटचा पर्यायही वापरू शकतात. स्वीप-इन अकाउंट्सना टू इन वन अकाउंट किंवा मनी मल्टिप्लायर अकाउंट असंही म्हणतात. कारण त्यातून बचत खात्याच्या तरलतेचा लाभ तर मिळतोच, शिवाय एफडीचा व्याजदरही मिळतो. स्वीप इन एफडी अकाउंटचे व्याजदर रेग्युलर एफडीसारखेच असतात, शिवाय गुंतवणूकदारांना बचत खात्याच्या लिक्विडिटीचा लाभही घेता येतो. स्वीप इन अकाउंटमधील निधी वापरण्यासाठी किंवा मुदतीआधी काढून घेण्यासाठी दंड आकारला जात नाही.
३) लॅडरिंग ॲप्रोचचा (Laddering Approach) याअंतर्गत गुंतवणूकदार त्याची गुंतवणूक विविध मुदतींमध्ये करतो. म्हणजेच एकाहून अधिक प्रॉडक्टमध्ये वेगवेगळ्या तारखांना मॅच्युअर होईल अशा पद्धतीने गुंतवणूक करता येते. एक वर्षाच्या कालावधीऐवजी एक, तीन आणि पाच वर्षांच्या पर्यायातही गुंतवणूक करता येते. मॅच्युअर झालेली एफडी रिन्यूही करता येते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.