मी नास्तिक म्हटलं तर लागलं, पण सुप्रिया सुळेंनीच संसदेत माझे वडील नास्तिक… राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

सुप्रिया सुळे यांनीच संसदेत माझे वडील नास्तिक असल्याचे म्हटले आहे - राज ठाकरे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

औरंगाबाद : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासाठी खास काही संदर्भही आणले होते. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची यादीच वाचून दाखवली. शरद पवार यांनी आपल्याला हवं तेवढंच न वाचता हे सर्व वाचावं असा टोलाही लगावला. यावेळी राज यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचा नास्तिक म्हणूनही उल्लेख केला. विशेष म्हणजे याबाबतचा उल्लेख स्वत: सुप्रिया सुळे यांनीच केल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

READ ALSO : भोंग्याच्या मुद्यावर बोलत असतानाच सुरू झाली अजान; राज ठाकरेंनी संतापून, ‘‘आताच्या आत्ता…’’

राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग मंदिरांमधील फोटो यायला लागले.”

READ ALSO : शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी, त्यांच्या तोंडून कधीच शिवाजी महाराजांचे नाव ऐकले नाही; राज ठाकरेंची सडकून टीका!

“सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्षा आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते.” असं राज ठाकरे म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.