भाजपचा विजय झाल्यास, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला

0

अकोला : विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला आता केवळ १ तास शिल्लक राहिलेला आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या निवडणुकीवरून मोठा संघर्ष पेटला आहे. आजही दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. अशावेळी रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अकोला येथे खाजगी संमारंभात आले असताना आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. अकोला महानगरपालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भाजप सोबत एकत्रित लढणार आहे. अग्निपथ योजनेच्या संदर्भात तरुणांच्या मनांत अनेक संभ्रम आहेत, त्यामुळे या योजनेच्या नियमांत बदल करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून रामदास आठवले यांनी ‘तुम्ही कितीही करा दावा, या तुम्ही परत आपल्या गावा..’ अशी कविता सादर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आठवले म्हणाले, सर्व विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.