पोर्न व्हिडिओ बघायला गेला अन् स्वत:चाच गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ समोर आला… मग

बंगळुरू येथील एका तरुणासोबत ही घटना घडली

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा

कर्नाटकमधील बंगळुरू शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका २५ वर्षीय तरुणाने पोर्न व्हिडीओ बघण्यासाठी एक वेबसाइट ओपन केली, मात्र बघतोय तर काय? वेबसाइटवर चक्क स्वत:चाच गर्लफ्रेंडसोबतचा पोर्न व्हिडीओ त्याला वेबसाइटवर बघावयास मिळाला. या व्हिडीओ बघून त्याला चांगलाच धक्का बसला. त्याचे झाले असे की, तो गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. याठिकाणीच त्याचा हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा त्याला संशय असून, याबाबत त्याने सायबर पोलिसात तक्रार देखील केली आहे. सायबर पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ‘संबंधित तरुण हा बेंगळूरमधील एका बीपीओमध्‍ये काम करतो. काही दिवसांपूर्वी तो पूर्व बंगळूरमधील एका हॉटेलमध्‍ये आपल्‍या गर्लफ्रेंडसोबत केला होता. येथील रुममध्‍ये दोघांनी काही वेळ व्‍यतित केला. त्‍यांच्‍या ‘खासगी’ क्षणांचा व्‍हिडीओ काहींनी गुप्‍त कॅमेर्‍याने टिपला. हाच व्‍हिडीओ पॉर्न बेबसाईटच्‍याव वेगवेगळ्या साईटवर अपलोडही केला.

२१ जानेवारी रोजी या तरुणाने पॉर्न पाहण्‍यासाठी वेबसाईट ओपन केली. त्‍यावेळी त्‍याला स्‍वत:चा गर्लफ्रेंडसोबतचा
व्‍हिडीओ त्‍याला दिसला. हा व्‍हिडीओ पाहून तरुण हादलाच. त्‍याच्‍या पायाखालची जमीन सरकली. त्‍याने थेट पोलिस
स्‍टेशनला धाव घेतली.

रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

या पॉर्न व्‍हिडीओमध्‍ये दिसत असणारे तरुण-तरुणीचे चेहरे फुसट करण्‍यात आले आहेत. तरीही शरीरावरील
जन्‍मखुणांवरुन हा आपलाच व्‍हिडीओ असल्‍याचा दावा या तरुणाने केला आहे, असे पोलिसांनी साांगितले. हा व्‍हिडीओ छुप्‍या पद्‍धतीने रेकॉर्ड झालेलाच नाही. कारण व्‍हिडीओ हा वेगवेगळ्या अँगलमधून चित्रीत झाला आहे. आता आम्‍ही व्‍हिडीओ चित्रीत करणार्‍या आणि तो वेगवेगळ्या पॉर्नसाईटवर अपलोड करणार्‍यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच हा व्‍हिडीओ अपलोड करणारा सापडला तर मोठे रॅकेट उघडकीस येण्‍याची शक्‍यताही पोलिसांकडून व्‍यक्‍त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.