ऑफिसमध्ये एक्सबरोबर काम करावं लागतंय… कशी हाताळाल परिस्थिती?

एक्ससोबत काम करताना काय करावे याबाबतच्या काही टीप्स

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

एखाद्या मुलीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, पण काही कारणामुळे तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. काही वर्षानंतर तुम्ही तुमचा संसार थाटता. आपल्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगता. पण अशात अचानकच जेव्हा तुम्ही तुमची एक्स तुमच्या समोर येते. त्यातही एकाच ऑफिसमध्ये तुमचा पुन्हा सामना होतो, तेव्हा ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळता याचाच काही टीप्स या वृत्तात आम्ही तुम्हाला देत आहोत….

१. ऑफिसमध्ये रिलेशन उघड होऊ देऊ नका

जर इतरांना या नात्याबद्दल माहिती नसेल तर ते गुप्त राहू देणे चांगले आहे. बाकी ऑफिसच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली तर तो विनाकारण गॉसिपचा विषय बनेल. जुने नाते जितके गुप्त राहिल तितके चांगले.

२. आव्हानापासून पळ काढू नका

जर तुम्हाला ऑफिसमध्ये एक्सला सामोरे जावे लागत असेल तर या आव्हानापासून पळ काढू नका, तर आरामात सामोरे जा. सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तितके सामान्य वागण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे असं शो करा की आधी काही झाले नाही.

३. झालं गेलं गंगेला मिळालं

तुम्ही दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्यापासून तुम्हाला एकमेकांच्या खाजगी गोष्टी माहीत असतीलच, पण जुन्या गोष्टींवर कधीही चर्चा करू नका, असं केल्यानं दोघांच्या जुन्या जखमा ताज्या होतील. यापेक्षा उत्तम आहे की चांगल्या कलीगप्रमाणे नव्याने सुरुवात करणे चांगले.

४. एकत्र काम न करण्याचा प्रयत्न करा

जर तुम्ही दोघांना एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा ग्रूपमध्ये काम करण्यासाठी दिलं असेल, तर त्याच कार्यालयात इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा, ज्यासाठी अधिक संवाद आवश्यक असेल आणि अनावश्यक संघर्ष टाळा.

५. एक्सच्या विनोदांकडे दुर्लक्ष करा

जर तुमचा एक्स पाय ओढण्याचा किंवा खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या विनोदांवर हसणं टाळा. अशा विनोदांकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे. कारण राग आल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.