जीभ मलाही आहे, मीही बोलू शकतो; राज ठाकरेंच्या सभेनंतर इम्तियाज जलील यांचा इशारा

आम्ही बोललो असतो तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

औरंगाबाद : महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबाद येथे झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या जाहीर सभेवर आता विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह भोंग्याच्या मुद्यावर पुन्हा एकदा इशारा देणारे विधान केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची काहीशी उजळणी देखील करून दिली. तसेच ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवावेत अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

READ ALSO : भोंग्याच्या मुद्यावर बोलत असतानाच सुरू झाली अजान; राज ठाकरेंनी संतापून, ‘‘आताच्या आत्ता…’’

दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर एमआयएमचे औरंगाबाद येथील खासदार इम्तियाझ जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘सियासत की दुकानों मे रोशनी के लिए, जरुरी है मुल्क मेरा जलता रहें”, (आपल्या राजकारणासाठी लोकांमध्ये भांडण होत राहावी) हाच हेतू राज ठाकरेंच्या भाषणाचा होता, अशी टीका जलील यांनी केली आहे.

READ ALSO : Live : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा पाहा इथे

इम्तियाज जलील म्हणाले की, “राज ठाकरेंनी अल्टिमेटम मुस्लीम समाजाला नाही, तर राज्य सरकारला दिलंय. त्यामुळे हा संपूर्ण मुद्दा राज्य सरकार कसा हाताळते हे पाहणं महत्वाचं आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं आहे, त्यामुळे ते ही परिस्थिती कशी हाताळते, काय निर्णय घेतात हे पाहू. पण ३ मे ची तारीख एका दिवसांनी वाढवली आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत. याचा अर्थ ते अयोध्येला निघून जातील आणि नंतर कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावावी, काही झाल्यास कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावेत, राज मात्र अयोध्येला जातील. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याऐवजी त्यांना भरकटवण्याचं काम राज ठाकरे करत आहेत,” अशी टीका इम्तियाझ जलील यांनी केली.

READ ALSO : ‘‘सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ दे’’, भोंग्याच्या मुद्यावरून राज ठाकरेंचा इशारा!

“तुम्ही भाजपाच्या इशाऱ्यावर हे सगळं करत आहात, मग त्यांची देखील यापूर्वी पाच वर्ष राज्यात सत्ता होती. त्यांनी त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन का केलं नाही. राज्यात सगळं सुरळीत चाललंय, करोनातून वाचलो आहोत, वर्षापूर्वी आपण औषधांसाठी भांडत होतो आणि आता आपण रोजगार, महागाई, आरोग्य सुविधा हे सर्व सोडून भोंग्यांवर बोलत आहात. इतिहास आता पुन्हा उकरून काढण्यात काही अर्थ नाही,” असं इम्तियाझ जलील म्हणाले.

READ ALSO : शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी, त्यांच्या तोंडून कधीच शिवाजी महाराजांचे नाव ऐकले नाही; राज ठाकरेंची सडकून टीका!

“माझ्या सभेला गर्दी होते म्हणून मी निर्णय घेणार, असं नसतं. आणि जर असं असेल तर त्याच मैदानात दुपटीने लोक बोलवून मला सभा घेण्याची परवानगी द्या, त्याच्यापेक्षा मोठं मैदान असेल तर त्याची परवानगी द्या. हा देश संविधानावर चालतो, इथे हुकूमशाही चालत नाही. आम्ही एवढं बोललो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. जीभ मलाही आहे, मी ही बोलू शकतो, नियम सगळ्यांसाठी आहे. ज्या भाषेचा वापर तुम्ही करताय, त्यापेक्षा चांगली भाषा मी बोलू शकतो,” असा इशारा इम्तियाझ जलील यांनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर दिला. मात्र, आपण तसं करणार नसून राज्यात सर्वांनाच राहायचं आहे, असंही इम्तियाझ जलील म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.