सुप्रिम कोर्टाचा दिलासा एकाच पक्षातील लोकांना कसा? संजय राऊतांनी न्याय व्यवस्थेवरच उपस्थित केले प्रश्न

परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. यापार्श्वभूमीवर शिनसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना न्याय प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे अशा प्रकारचा दिलासा एकाच पक्षातील लोकांना कसा काय मिळतो? असे म्हणत त्यांनी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संजय राऊत म्हणाले, कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलीस निष्पक्ष तपास करु शकत नाही असा ठपका आपण कसा ठेवू शकता. महाराष्ट्र पोलिसांची देशातील सर्वात जास्त निष्पक्ष पोलीस म्हणून ओळख आहे. तरीही त्यांच्यावर अशाप्रकारचा ठपका ठेवून कुठेतरी महाराष्ट्र विरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यांच्यावर कट रचले जात आहे, हे दुर्दैवी आहे. सुबोध जयस्वाल यांच्यावर आमचा विश्वास आहे.

महाराष्ट्राची जनता प्रत्येक गोष्टीची नोंद घेत आहे. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे पोलीस या सर्व प्रकरणांमध्ये एका विशिष्ट निर्णयापर्यंत, तपासाच्या एका टप्प्यापर्यंत आल्यावर अशाप्रकारचा दिलासा मिळत आहे. असे दिलासे इतरांना का मिळत नाहीत? पोलीस मुख्य आरोपीवर कारवाई करण्यापर्यंत येतात तेव्हाच दिलासा मिळतो. सुबोध जयस्वाल यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांना राज्याची स्थिती पूर्णपणे माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.