२९ लाख रुपयांसाठी सनी लिओनीच्या सेटवर पोहोचले गुंड; शुटिंग गुंडाळली, वाचा नेमके काय आहे प्रकरण!

0

मुबई : अभिनेत्री सनी लिओनी काही दिवसांपूर्वीच चेन्नई प्रकरणावरून समोर आली होती. आयोजकांचे पैसे बुडविल्यावरून तिला पोलिसांच्या चौकशीचा सामनाही करावा लागला. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली. सनी सध्या तिच्या आगामी ‘अनामिका’ या वेबसिरीजच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. विक्रम भट दिग्दर्शित या वेबसिरीजची मुंबई येथे सध्या शुटिंग सुरू आहे. मात्र शुटिंगदरम्यान अशी काही घटना घडली, ज्यामुळे सनीला चांगलाच धक्का बसला. होय, रिपोर्टनुसार जेव्हा शूटिंग सुरू होती, तेव्हा काही गुंड चक्क सेटवर पोहोचले होते. त्यांनी दिग्दर्शक विक्रम भट यांच्याकडे तब्बल २९ लाख रुपयांची मागणी केली. हे प्रकरण ॲक्शन दिग्दर्शक अब्बास अली मोघुल यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल असल्याचे सांगण्यात येते. 

अचानकच हे गुंड सेटवर आल्याने सगळ्यांचीच बोलती बंद झाली. यावेळी विक्रम भट यांनी अगोदर सनीला सुरक्षित ठिकाणी पाठविले. त्यानंतर गुंडाना निपटवले. या संपूर्ण राड्यादरम्यान, सनी चांगलीच घाबरली होती. मात्र सुदैवाने ती सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, विक्रम भट यांनी एका मुलाखतीत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यांनी म्हटले की, मी अस्वस्थ होतो. मला काय करावे, हे माहित नव्हते. माझ्याकडे जबरदस्तीने अब्बासला देणाऱ्या सेक्सचे स्नॅपशॉट्‌स मागण्यात आले. नंतर त्याच्या टीमकडून एका व्यक्तीने येऊन तपासणी केली. विक्रमनं सांगितले, तोपर्यंत सूर्यास्त झाला होता आणि मी ज्या सीनचे प्लानिंग केले होतो, ते शूट नाही करु शकलो.

दरम्यान, जेव्हा ई- टाइम्सने अब्बासशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले, मी आता काय बोलू? फायटर असोसिएशन या प्रकरणाचा शोध घेत आहे, आशा आहे ते हे प्रकरण सोडवतील. अब्बास यांच्या बोलण्यावर विक्रम यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ते कशाबद्दल बोलत आहेत? जर मी अब्बासचे २ फोन घेऊ शकत नसतो तर तो माझ्याकडे दुसर्‍या मार्गाने पोहोचू शकत नव्हता? मला त्याला २९ लाख रुपये द्यायचे नाही आहेत. त्याने कोणताही करार केला नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.