तीन जागतिक व एका राष्ट्रीय पुरस्काराने होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. मुकेश मुसळे यांचा सन्मान

होमिओपॅथी क्षेत्रात अशाप्रकारचा पुरस्कार मिळविणारे डॉ. मुसळे देशात पहिले

0

नाशिक : अकोले येथील एका अकरा महिन्याच्या चिमुकलीला ‘थ्रोम्बोसायटोपेनिया’ नावाचा आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. तिच्या प्लेटलेट झपाट्याने कमी होत होत्या. जेव्हा तिला नाशिकचे होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. मुकेश नथु मुसळे यांच्याकडे आणण्यात आले, तेव्हा त्यांनी होमिओपॅथिच्या उपचाराने केवळ आठ तासातच तिच्या प्लेटलेट 44 हजारांवरून 84 हजारांपर्यंत नेल्या होत्या. तर एका दिवसानंतर 1 लाख 29 हजारांपर्यंत वाढविल्या. ‘होमिओपॅथी’मध्ये ही एक ऐतिहासिक घटना मानली जात असून, त्याची दखल भारतासह जागतिक स्तरावरही घेण्यात आली आहे. या कामगिरीसाठी डॉ. मुसळे यांना तीन जागतिक तर एका राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, अशाप्रकारच्या प्रकरणात हा सन्मान मिळविणारे ते पहिलेच भारतीय होमिओपॅथी डॉक्टर ठरले आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अकरा महिन्याच्या मुलीला थ्रोम्बोसायटोपेनिया आजाराचे निदान झाल्यावर तिच्या शरीरातील प्लेटलेट अचानक कमी झाल्या होत्या. तिच्या हाता-पायांवर रॅशेस पडल्याने, तिला अशक्तपणा तसेच डेंग्यूचे निदान होण्याची शक्यता होती. अशात तिला रुग्णालयात दाखल न करता डॉ. मुकेश मुसळे यांनी तिच्यावर होमिओपॅथी उपचार करण्याचे ठरविले. त्यास तिच्या पालकांनीही सकारात्मकता दर्शविली. पुढे डॉ. मुसळे यांनी काही तासातच या चिमुकल्याच्या शरिरातील प्लेटलेटचे प्रमाण संतुलित केले. होमिओपॅथी क्षेत्रात ही बाब ऐतिहासिक घटनेपैकी एक मानली गेल्याने, जागतिक स्तरावरील नामांकित संस्थांनी त्याची दखल घेत त्यांचा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. या कामगिरीसाठी त्यांना ‘चॅम्पियन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ वर्ल्डस् रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हे जागतिक तर ‘आसाम बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

नाशिक : पत्रकार परिषदेत पुरस्काराबाबत माहिती देताना डॉ. मुकेश मुसळे

यु-ट्यूब व दिल्ली येथील त्यांच्या पॅथोलॉजिस्ट मित्राच्या मदतीने या संस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या संस्थांकडून त्या चिमुकलीच्या उपचाराशी निगडीत सर्व माहिती मागविण्यात आली. तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबईचे पत्रही मागविले. या सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर डॉ. मुकेश मुसळे यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रशिस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह, मेडल असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. मुसळे हे देशातील पहिलेच होमिओपॅथी डॉक्टर ठरले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अधोरेखित करण्यासाारखी बाब म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही त्यांच्या या कामगिरीची दखल घेतली आहे. या पुरस्कारांसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.