मास्कसक्तीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान, म्हणाले…

जर रुग्णसंख्या वाढली तर राज्यात पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, असे मंत्री टोपे म्हणाले

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

जालना : सध्या जगभरासह भारतातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यांची आढावा बैठक घेत सतर्कता बाळगण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. सध्या राज्यात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली तरी, खबरदारी सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जर रुग्णसंख्या वाढली तर, पुन्हा मास्कसक्ती करावी लागेल, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालण्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मास्कसक्तीबाबतचे विधान केले. मंत्री टोपे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रात सध्या करोना रुग्णसंख्या कमी असून राज्य रुग्णसंख्येच्या बाबतीत आठव्या क्रमांकावर आहे. राज्यात चांगल्या पद्धतीने झालेल्या लसीकरणाचा हा परिणाम आहे.’’

“सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असून केंद्राकडून सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन केलं जाईल आणि आरोग्य विभागाला तशा सूचना केल्या जातील. मात्र नागरिकांनी मास्क वापरावा,” असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसंच भविष्यात करोना रुग्णसंख्या वाढल्यास मास्कसक्ती करावी लागेल असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.