तुम्ही फेसबुकचं हे फीचर ॲक्टिवेट केलं काय? लवकर करा, नाहीतर लॉक होईल तुमचं अकाऊंट!

Facebook Protect ऑन करण्यासाठी कंपनीकडून युजर्सला मेल पाठवले जात आहेत

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

आज सोशल मीडिया विशेषत: फेसबुक अनेकांसाठी जीव का प्राण आहे. असे कित्येक युजर्स आहेत, जे २४ तासातून १२ तासांपेक्षा अधिक वेळ फेसबुकवर व्यतीत करतात. अशा सर्व युजर्ससाठी आम्ही एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. होय, ज्यांनी फेसबुक प्रोटेक्ट ॲक्टिवेट केलं नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीला फेसबुकने याबाबत युजर्सला मेल पाठवले होते. मेलमध्ये तुमच्या अकाउंटला अ‍ॅडव्हान्स सिक्योरिटीची फेसबुक प्रोटेक्टची गरज असल्याचं सांगण्यात आलं होतं.

The Verge च्या रिपोर्टनुसार, कंपनी युजर्सला १७ मार्चपर्यंत Facebook Protect ऑन करण्यासाठी मेल पाठवत होती. असं न केल्यास अकाउंट लॉक करण्याचंही त्यात सांगण्यात आलं होतं. security@facebookmail.com कडून हा मेल पाठवण्यात आला होता. परंतु हा मेल अनेक युजर्सच्या स्पॅम फोल्डरमध्ये गेला. कंपनीने हाय-रिस्क युजर्सला १७ मार्चपर्यंत अकाउंट प्रोटेक्ट (Facebook Account Protect) करण्यासाठी सांगितलं होतं.

सर्वात आधी फेसबुक टॉप राइट कॉर्नरमध्ये डाउनवार्ड फेसिंग ॲरोवर क्लिक करा.

आता Settings and Privacy मध्ये Settings मध्ये जा.

त्यानंतर Security and Login वर क्लिक करा.

त्यानंतर Facebook Protect मध्ये Get Started वर क्लिक करा.

आता Next वर क्लिक करुन पुढील प्रोसेस करा.

दरम्यान, फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह कमेंट करणं महागात पडू शकतं. इतकंच नाही, तर जेलची हवाही खावी लागू शकते. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. फेसबुकवर असे काही युजर्स आहेत, जे इतरांच्या पोस्टवर चुकीच्या कमेंट्स करुन त्यांना बदनाम करण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा युजर्सच्या कमेंट्सवर फेसबुक कारवाई करू शकतं. तुमची एक चूक गंभीर गुन्ह्याअंतर्गत थेट जेलमध्ये पोहोचवू शकते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.