लग्नाचे अमिष दाखवून विवाहीत जीम ट्रेनरने केला बलात्कार

यूपीएससीच्या तयारी करणाऱ्या तरूणीवर जीम ट्रेनरने वारंवार बलात्कार केला.

0

औरंगाबाद : यूपीएससी परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विवाहित जीम ट्रेनरने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना औरंगाबाद येथे नुकतीच समोर आली आहे.

याविषयी पिडितेने दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. कार्तिक राजू लोकल (रा. कडा कार्यालय क्वार्टर) असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, शहरातील विवाहीत तरुणीचे पतीसोबत पटत नसल्याने ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे गतवर्षी राहत होती. २९ मार्च २०२० रोजी आरोपी कार्तिकसोबत इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर तिची ओळख झाली. या ओळखीतून दोघांचे रूंतार मैत्रित आणि नंतर प्रेमात झाले. तेव्हा तिने ती पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे तर त्याने तो अविवाहीत असल्याचे परस्परांना सांगितले. लॉकडाउन लागल्याने ती औरंगाबादला परतली तेव्हा आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर १२ मे २०२० पासून २६ जानेवारी २०२१ पर्यंत लैगिंक अत्याचार केले.

तरुणीने लग्नची मागणी केल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत असे. यामुळे पिडितेला त्याच्यावर संशय आल्याने तिने थेट त्याचे घर गाठले. यावेळी कार्तिकचे मे २०२० मध्ये लग्न झाल्याचे तिला समजले. तिने याचा जाब विचारल्याने कार्तिकने तिला घरी जाऊन मारहाण केली. यानंतर पिडीतेन जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार नोंदविली. आरोपी कार्तिकविरूद्ध बालात्कार करणे, मारहाण करणे, फसवणुक करणे आदी कलामानुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे या तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.