शरद पवारांसारख्या भ्रष्ट व्यक्तीचे हात आहिल्याबाईंच्या पुतळ्यात लागू नयेत; गोपीचंद पडळकर

0

पुणे : जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी (दि.१३) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र त्यापूर्वीच भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहाटे समर्थकांसही गडावर जाऊन मेढपाळांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा असा वाद उफाळून आला आहे. दिवसभर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतले. दरम्यान, पडळकरांच्या या कृतीविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

जेजूरी गडावर काही दिवसांपूर्वीच अहिल्याबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र कोरोना काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे या पुतळ्याचे अनावरण रखडले होते. शनिवारचा मुहूर्त काढत या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजित असतानाच पडतळकर यांनी पुतळ्याचे उद्‌घाटन केले. पडळकरांच्या या कृतीमुळे राज्यात चांगलेच वातावरण तापले असून, पडळकरविरूद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगल्याचे दिसत आहे.

दरम्यान, उद्‌घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याच्या हातून अहिल्यांबाईच्या पुतळ्याचे अनावरण होऊ नये, अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे. म्हणून आपण छुप्या पद्दतीने या पुतळ्याचे अनावारण केले आहे. आहिल्याबाईंचे काम हे बहुजन समाजाबरोबरच समाज कल्याणासाठी होते. त्यामुळे पवारांच्या हस्ते पुतळ्याच्या आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये म्हणूनच आम्ही गणिमी काव्याने जाऊन पुतळ्याचे अनावरण केल्याचे पडळकरांनी म्हटले.

दरम्यान, पडळकरांच्या या कृतीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. शरद पवार हे वाईट प्रवृत्तीचे आहेत. आहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार काम करीत आहेतत. त्यामुळे त्यांच्या हातून आहिल्यादेवीच्या पुतळ्याचे अनावरण होउ न देणे हीच आमची इच्छा होती, असेही पडळकरांनी सांगितले. दरम्यान, पडळकर पुतळ्याचे अनावरण करून जेव्हा गडाच्या खाली उतरले तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली.

डिपॉझिट जप्त झालेल्यांना गांभीर्याने घेऊ नका

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडळकरांच्या या कृतीचा चांगलाच समाचार घेतला. ज्याचे डिपॉझिट जप्त झाले आहे, त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी शब्दात अजित पवार यांनी पडळकरांना फटकारले आहे.  अ

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.