चाळीसगाव विधानसभेची गमावलेली जागा पुन्हा मिळवा – जयंत पाटील

0
जळगांव : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपला चाळीसगावमध्ये ४ हजार मतांनी पराभाव झाला . परंतु २०२४ सालात  परतफेड करा. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी झपाट्याने काम करा ही जागा पुन्हा  निवडून यायलाच हवी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस महासंवाद अभियान अंतर्गत चाळीसगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दि 9 रोजी दुपारी येथील राजपूत मंगल कार्यालयात मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, मनिष जैन, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, मेहबूब शेख, उमेश नेमाडे, माजी आमदार राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, सतीष दराडे, डॉ. संजीव पाटील, कैलास सुर्यवंशी, सुनील गव्हाणे यांच्यासह तालु्नयातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा तेराव्या दिवशी चाळीसगावमध्ये पोचली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे.या संवादाच्या माध्यमातून काही सुचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी ही संवाद यात्रा काढल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. अनेक कार्यकर्त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कामाबाबत थेट जयंत पाटलांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.  पक्षाची तालुक्यात  असलेल्या या वाताहातीने संतप्त झालेल्या जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत निष्क्रीय पदधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवून निष्ठा असणाऱ्या व चांगले कार्य करणाऱ्यांना पदे द्या असे सुनावले.राजीव देशमुख यांना तालुक्यात सर्वत्र सहानुभूती असतांना देखील त्याचे मतात रूपांतर करण्यात अपयशी ठरलो.विधानसभा निवडणूक आणि साखर कारखान्याच्या निवडणूकीत फरक असतो तो फरक न ठेवल्यानच देशमुखांचा पराभव झाला अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त करून आगामी काळात झालेल्या चूका दूरूस्त करून तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रबळ करा असे सांगितले.
 एकनाथराव  खडसे यांच्यासारखे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा खूप उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा, इथे जागा निवडून आणणे मोठी गोष्ट नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव  खडसे यांनी व्यक्त केला. या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा असे सांगतानाच राजीवदादा तुझ्या पाठिशी आहोत असे आश्वासनही एकनाथराव  खडसे यांनी दिले. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. जळगाव जिल्ह्यातही पक्ष एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचे आहे असा आत्मविश्वास एकनाथराव  खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.यावेळी भाजपमधील खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.