पूजा चव्हाण प्रकरणातील हा ‘गबरु’ नक्की कोण आहे?, जाणून घ्या सत्य!

पूजा चव्हाण प्रकरणात सामेर आलेल्या फोटोवरून एकच खळबळ उडाली आहे.

0

मुंबई : टीक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणात ‘गबरु’ नावाची एंट्री झाली असून, हा गबरु नक्की कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नुकतेच या प्रकरणातील काही फोटोज्‌ व्हायरल झाले असून, एका केकवर ‘हॅप्पी बर्थडे गबरु’ असे लिहिले आहे. त्यामुळे हा फोटो चर्चेला हवा देणारा असून, हा गबरु नक्की कोण? त्याचा हा प्रकरणाशी काय संबंध? पूजा आणि गबरु यांच्यातील नेमकं नातं काय? असे एका ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

त्याचबरोबर दुसऱ्या एका फोटोमध्ये एक व्यक्ती आपल्या हाताने पूजा चव्हाणला केक भरवताना दिसत आहे. हा हात पुरुषाचा असून, त्याच्या मणगटावर शिवसेनेचा धागा (शिवबंधन?) आहे. त्याशिवाय त्याच हातावर एक काळा धागाही बांधलेला दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचा धागा असलेला हा हात म्हणजेच गबरु तर नाही ना? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

आणखी एक फोटोमध्ये पूजा चव्हाण स्वत: वनमंत्री असं नाव लिहिलेला केक कापताना दिसत आहे. या केकवर वनमंत्री संजय राठोड यांची छबी असून, सोबत त्यांच्या लाल दिव्याच्या दोन कारही या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोकडे पूजा खूपच आनंदाने बघताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील भाव आनंद व्यक्त करणारे असल्याचे दिसून येते.

आणखी एक फोटो जो नक्कीच या प्रकरणाला एक वेगळीच हवा देवून जाणारा ठरत आहे. दोन वेगवेगळ्या फोटोमध्ये पूजा चव्हाण आणि वनमंत्री संजय राठोड दिसत आहे. या फोटोतील कॉमन बाब म्हणजे दोघांनी जरी वेगवेगळे फोटो काढले असले तरी त्यांच्या डोक्यावरील फरची पांढऱ्या रंगाची टोपी एकच आहे. त्याशिवाय लोकेशन, लॉन आणि बॅकग्राऊंडही सेम आहे. त्यामुळे हे सर्व फोटो या प्रकरणाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाणारे असून, गबरु या नावाचा उलगडा करणारेही ठरत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या फोटोंवरून शंका-कुशंका उपस्थित केल्या जात असतानाच, एक अशी ऑडिओ क्लिप हाती लागली आहे. ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वळणे देणारे ठरू शकते. ही ऑडिओ क्लिप पूजाच्या लॅपटॉपमधीलच असल्याचे बोलले जाते. या ऑडिओ क्लिपमध्ये खालील संवाद आहे. 

गबरुशेठ – हॅलो

पूजा चव्हाण – आपका हुकूम सर आँखों पर..रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय.

गबरुशेठ – हाहाहाहाहा…क्या बात है..थँक्यू थँक्यू..

पूजा चव्हाण – मी महिनाभर तरी काढणार नव्हते, मात्र तुमच्या शब्दापुढे जाता येत नाही.

गबरुशेठ – असं का…?

पूजा चव्हाण – विचारा किती दिवसांपासून…आठ दिवस झाले….अजून महिनाभर ठेवणार होते.

गबरुशेठ – वेटिंगवर टाका वेटिंग…मग बाकी…

पूजा चव्हाण – बाकी काय…हाय की आता तुमचं…काय करावं…इलाज नाही..

गबरुशेठ – कवा जायचं आपल्याला…

पूजा चव्हाण – मुंबईला आपणच का?

गबरुशेठ – कुठंही जाऊ काय त्यात?

पूजा चव्हाण – बघा…आं…

गबरुशेठ – यस्स्स….

पूजा चव्हाण – कुलू मनालीला…आणि जम्मू काश्मीरला जाऊ…

गबरुशेठ – 100 टक्के जाऊ…

पूजा चव्हाण – बघा रं…

गबरुशेठ – होय..

पूजा चव्हाण – लवकर वापस या..मग..

गबरुशेठ – ठीकय…

पूजा चव्हाण – लगेच निघा…काम झाल्या झाल्या…मग जाऊयात…

गबरुशेठ – बरं…

पूजा चव्हाण – पुणे, मुंबई बस झालं आता…

पूजा चव्हाण – त्यांना म्हणावं…आधीच काडीयत..वाळून जाता म्हणावं..

गबरुशेठ – मग…

पूजा चव्हाण – खरं हाय का नाही…

गबरुशेठ – खरंय…खरंय..

पूजा चव्हाण – वाळून जाताल म्हणावं…उंच आहात..नाहीतर काय?

गबरुशेठ – खाऊ पिऊ घालत नसाल…

पूजा चव्हाण – बघा ना…काय माहित…विचारा त्यांना..

गबरुशेठ – तुमच्यामुळंच झालं ना…

पूजा चव्हाण – माझ्यामुळं कशाला…मी थोडीच त्यांना खाऊ पिऊ घालते..

गबरुशेठ – असंय का?

पूजा चव्हाण – मी ज्यादिवशी डबा देते ना….त्यादिवशी त्यांचं पोट पुढे येतं…

गबरुशेठ – काय काय…

पूजा चव्हाण – मी ज्यादिवशी डबा देते ना….त्यादिवशी त्यांचं पोट पुढे येतं… बाकी मजेत असतं सगळं..

गबरुशेठ – तुमचंबी पोटं पुढं आलंय..म्हणं ना…

पूजा चव्हाण – कोणाचं…माझं नाहीरं बाबा..स्लीम झालीय मी आता..

गबरुशेठ – हाहाहाहा

पूजा चव्हाण – स्लीम झाले मी आता…

गबरुशेठ – बरं..चालतंय…मग बाकी?

पूजा चव्हाण- बाकी काय निवांत…गच्चीवर उभी ठाकलीय… बघा हवा यायलीय मस्त…

गबरुशेठ – जास्त वेळ बोलू शकत नाही…

पूजा – हा सोबत माणसं आहेत ना…

गबरुशेठ – हो..हो..

पूजा चव्हाण – कळलं कळलं…झोपते मग मी…

गबरुशेठ – सकाळी बोलतो…

पूजा चव्हाण – ऐकलं बरं तुमचं… आता झोपते मी..

गबरुशेठ – हो..हो…झोपा झोपा..

पूजा चव्हाण – आणि त्यांना सांगा फोन करु नका….झोपू द्या…

गबरुशेठ – बरं बरं..फोन नाही करणार..ठीक आहे..

पूजा चव्हाण – हम्म्म…बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..

गबरुशेठ – बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..ओके बाय…

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.