माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांना ‘त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर पुरस्कार’ प्रदान!

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडून सन्मान

0
नाशिक : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडून माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांचा ‘त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी नासिक जिल्हा शाखेच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त रमाई पुरस्काराचे वितरण, बोधिवृक्ष विशेषांक प्रकाशन व महिला धम्म उपासिका (बौद्धाचार्य) प्रमाण पत्र  वितरण करण्यातआले. 
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या समता मुकनायक शताब्दी वर्षानिमित्त नासिक जिल्हा शाखेच्या वतीने प्रकाशित माता,पालक व मुलांसाठी  बुद्ध ,धम्म, संघ प्राथमिक माहिती व संस्कारयुक्त  पुस्तक अनिताताई ( गरूड ) वाकळे  यांनी महिलांकरिता ‘बोद्धीवृक्ष’ या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महिला धम्म उपासिका (बौद्धाचार्य) प्रमाणपत्र वितरण आणि माता रमाई पुरस्कार समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
अनुसयाबाई छबू काळे, ज्योतिताई बजरं शिंदे, सुनंदाताई बाळासाहेब शिरसाट यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी धम्मभूषण मोहन अढांगळे, सुदर्शन नगरे, वाय. डी. लोखंडे, प्रमोद पाटील, प्रा. डी. एम. वाकळे, किशोर मोरे, के. के. बच्छाव, बजरंग शिंदे, विनोद भिमराव काले, रवींद्र बी. काळे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमासाठी राज्य महिला विभागाच्या सचिव वैशाली डोळस, महासचिव संजय भरीत, मंदाकिनी दाणी, पी. डी. खरे, अशाेक गांगुर्डे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नासिक शहर शाखेचे अध्यक्ष बाळासाहेब सिरसाट, बबनराव काळे, संदेश पगारे व इतर शहर शाखेचे पदाधिकारी, सातपुर विभाग शाखा अध्यक्ष शांताराम पगारे व सर्व पदाधिकारी, धम्मदुत बुध्द विहार संस्थेचे अध्यक्ष भगवान भालेराव व पदाधिकारी, फुशाआ संस्थेचे अध्यक्ष  जगन्नाथ भरीत व पदाधिकारी, मानवतावादी संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे ,शिवाजी काळे, राजु नेटावटे, वसंत पंडित  तसेच परिसरातील सर्व धम्म उपासक उपासिका माता भगिनी बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान भालेराव यांनी केले. तर भवार व पुणम अहिरे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.