तांदूळ निर्यातीतून ४४ हजार ८९४ कोटींचे परकीय चलन

कोरोना परिस्थितीतही तांदूळ निर्यातीत उल्लेखनीय वाढ

0

नाशिक : आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील मोठा टप्पा पार करत, वर्ष २०२०-२१च्या पहिल्या ९ महिन्यांत देशाने तांदूळ निर्यातीत उल्लेखनीय वाढ नोंदविली आहे. तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने देशाला ४४ हजार ८९४ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे.

देशातील बिगर बासमती तांदळाला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत निर्यातीत १२२ टक्के वाढ झाली आहे. देशातून नेपाळ, बेनिन, युनायटेड अरब, सोमालिया, इराण, सौदी अरब, इराक, कुवैत, यूएसए, युके आदी देशांत बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. नऊ महिन्यांत बासमती तांदळाची ३३ लाख ८० हजार ८५४ मॅट्रिक टन निर्यात झाली असून, २२ हजार ३८ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. बिगर बासमती तांदळाची ८२ लाख १७ हजार २५५ मॅट्रिक टन निर्यात झाली असून, २२ हजार ८५६ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

मागील वर्षी याच काळात बासमती तांदळाची २८ लाख ४२ हजार मॅट्रिक टनाची निर्यात झाली होती. तर बिगर बासमती तांदळाची ३५ लाख ८७ हजार मॅट्रिक टनाची निर्यात झाली होती. बासमती तसेच इतर प्रकारच्या तांदळाचे निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने देशाला ४४ हजार ८९४ कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. बिगर बासमती निर्यातीत १२२ टक्के वाढ चालू आर्थिक वर्षातील एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यांत बिगर बासमती तांदळाची निर्यात १२२ टक्क्यांनी वाढली आहे. बिगर बासमती तांदूळ निर्यातीमधून २२ हजार ८५६ कोटींचा व्यवसाय झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.