एकनाथ खडसेंच्‍या विजयासाठी कार्यकर्त्यांचे महादेवाला साकडे

राष्ट्रवादी युवा किसानतर्फे महादेवाला दुग्धाभिषेक

0

जळगाव : प्रतिनिधी

राज्यात विधानपरिषदेची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मतांची जुळवाजुळव करताना राजकीय नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा ही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची होत आहे. एकनाथ खडसे यांचा विधान परिषदेवर विजय व्हावा व त्यांचे लवकरात लवकर मंत्री मंडळात पुनरागमन व्हावे; यासाठी राष्ट्रवादी युवा किसानतर्फे महादेवाला दुग्धाभिषेक करत साखडे घालण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्‍यावर मागील तीन– साडेतीन वर्षांपासून जो अन्याय होत आहे. त्यावर वाचा फोडण्यासाठी या संकल्प पूर्तीची अभिषेक करण्यात आला. शिवाय विधान परिषदेसाठी आज मतदान होत असून यात एकनाथ खडसे यांचा विजय होवून त्‍यांना लवकरात लवकर मंत्रीमंडळात स्‍थान मिळावे. तसेच त्यांच्यावर असलेल्या ईडीसह इतर चौकशींचे आरोप हे लवकरात लवकर नष्ट व्हावे; यासाठी महादेवाला साखडे घालण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राष्‍ट्रवादी युवा किसानचे जिल्हाध्य्ष सुरज नारखेडे, ललित नारखेडे, सिद्धार्थ सपकाळे, उमाकांत पाटील, चेतन इंगळे, मंगेश भोले, पंकज व्यास, राकेश चौधरी, आकाश रत्नपारखी यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवारांनी लावला जोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसे यांच्या विजयासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. कारण पूर्वाश्रमीचे भाजप नेते असलेले खडसे यांचा प्रवेश विधान परिषदेच्या सभागृहात झाला तर अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये असताना झालेला मानसिक छळ यामुळे खडसे देखील “अरे ला कारे” अशी चर्चा आता राज्यभरात होऊ लागली आहे.

खडसेंचे राजकीय भवितव्य पणाला

विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरत असताना खडसे यांनी भाजपवर टीका करताना सर्वाधिक रोष राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त केला आहे. गेल्या काळात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझे राजकीय अस्तित्व धोक्यात आले “या दोघांनीच माझा छळ केला” असा आरोप खडसे करीत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यामुळे खडसे यांना विधान परिषदेत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करू द्यायचा नाही त्यांचा पराभव करायचा असा हट्ट देखील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने केला आहे. त्यामुळे खडसे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.