डोळ्यांचे फडफडणे शुभ-अशुभ नव्हे तर असू शकतो गंभीर आजार, जाणून घ्या!

0

लोकराष्ट्र : ठराविक एका बाजूचा डोळा फडफडल्यास काही लोक त्यास अशुम मानतात, तर काही लोक यास शुभही मानतात. काही लोकांची अशी धारणा आहे की, डाव्या बाजूचा डोळा फडफडतो म्हणजे त्या व्यक्तीचे कोणाशी तरी भांडण होणार तर उजव्या बाजूचा डोळा फडफडणे म्हणजे काही तरी चांगली शुभ वार्ता मिळणार आहे. अर्थात लोकांच्या या धारणेला कुठलाही आधार नाही. खरं तर तज्ज्ञांच्या मते, ही एक आरोग्यासंबंधी समस्या आहे.

तज्ज्ञांच्या मते, डोळे जेव्हा फडफडतात तेव्हा त्याचा शुभ-अशुभशी काहीही संबंध नसतो. ही बाब डोळ्यांच्या रचनेशी संबंधित आहे. जेव्हा डोळ्यांच्या मांसपेशी अखडून जातात, तेव्हा डोळे फडफडू लागातत. ही फडफड दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकते. काही लोकांमध्ये हे अतिशय सामान्य असते. मात्र काही लोकांचे डोळे जोरजोरात फडफडतात. याला मेडिकल टर्ममद्ये ब्लेफेरोस्पाज्म म्हणतात. डोळ्याचे फडफडणे काही सेकंदांपासून ते कितीतरी तास असू शकतात. बऱ्याच लोकांना दिवसभर डोळा फडफडत असल्याचा त्रास होतो.

काहींच्या बाबतीत तर डोळा फडफडण्याचे प्रकार दिवसेंदिवस घडू शकतात. अर्थात यामुळे शारिराला कुठली व्याधी झाली असे होत नाहीत. केवळ कामात अडथळा निर्माण होण्याचे काम यामुळे होऊ शकतो. पण जर वारंवार डोळे फडफडत असतील तर ते गंभीर आजाराचे लक्षणेही असू, शकतात. कारण मांसपेशी अखडून गेल्या की, डोळा फडफडतो. तसेच डोळ्याला खाज आल्यास, डोळ्यांवर दबाव, झोप कमी झाल्यास किंवा थकवा आल्यास, औषधांचे साइडइफेक्ट, तंबाखून तसेच दारूचे अतिसेवन, यासोबतच कंजक्टीवाइटिस अथवा पापण्यांची सूजही यासाठी जबाबदार ठरू शकते.

जर डोळ्यांचे फडफडणे दीर्घकाळासाठी राहिल्यास याचा परिणाम तुमच्या नजरेवर होऊ शकतो. याचाच अर्थ तुमची नजर कमकुवत होऊ शकते. डॉक्टर म्हणतात की यासाठी तुम्ही नियमितपणे डोळ्यांचे चेकअप करा. जर एखादे इन्फेक्शन झाल्यास त्याकडे दुर्लक्ष नको. अधिककाळ डोळ्याचे फडफडणे सुरूच राहिल्यास, तत्काळ डॉक्टरांना दाखवून त्यासंबंधिचे मार्गदर्शन घ्यावे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.