जनावरांची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील पाच जणांना धुळ्यात अटक

0

धुळे : शेतक-यांच्या जनावरांची चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीच्या पाच चोरटयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या चोरटयांनी चोरी केलेले ४ बोकड व १६ बक-या असा  ९० हजारांचा मुददेमाल पोलिस पथकाने मध्यप्रदेशातुन हसतगत केला आहे.

धुळे जिल्हयात मोठया प्रमाणात पशुधनाची चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. शिंदखेडा तालुक्यातील पिंपरखेडा येथील बापू देवरे यांच्या शेतामधुन राजस्थानी शेरुळी जातीचे बोकड व बक-या चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यापार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी मोबाईलच्या डम डाटयाच्या आधारावर तपास सुरु केला. यात गेल्या दोन दिवसांपासुन 24 तास या डाटयाचा अभ्यास केला असता त्यात मध्यप्रदेशातील गँग कार्यांन्वीत असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे बुधवंत यांनी एका पथकाला मध्यप्रदेशात रवाना केले.या पथकाने सेंधवा वळण रस्त्यावर सापळा रचला.

यात फरहान उर्फ सोनु इकबाल कुरेशी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने हा गुन्हा एका टोळीच्या मदतीने केल्याची माहीती दिली. याकामात त्याने महताब वासकले , मांगीलाल अजनारे , सुनिल वासकले यांची देखिल मदत घेतल्याची माहीती दिल्याने पोलिसांनी तातडीने हालचाली करुन या चौघांना ताब्यात घेतले. या चौघांनी सुफा मुन्शी कुरेशी याला बोकड विक्री केल्याची माहीती दिल्याने त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेले चार बोकउ व 16 बक-या हस्तगत करण्यात यश आले.या चोरटयांनी धुळे जिल्हयातील ग्रामीण भागातुन पशुधनाची चोरी केल्याची शक्यता असुन त्यांना अटक करुन त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.