स्वतंत्र भारतात प्रथमच एका महिलेला चढवणार फासावर; गुन्हा ऐकल्यावर उडेल थरकाप

0

मथुरा : २००८ साली आपल्या प्रियकरासोबत घडविलेल्या हत्याकांडाच्या आरोपाखाली असलेल्या शबनम नावाच्या महिलेला फासावर चढविले जाणार आहे. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच एका महिलेवर फासावर चढविले जाणार आहे. उत्तरप्रदेशातील मथुरा येथील कारागृहात या महिलेला फाशी देण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. फाशी कधी देणार याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच या महिला कैद्याला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या शबनम उत्तर प्रदेशातील मथुरा कारागृहात बंद आहे. काही दिवसांपूर्वीच तिने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. मात्र तिची दया याचिका फेटाळून लावल्याने तिला लवकरच उत्तरप्रदेशातील एकमेव महिला फाशीघरात फासावर चढविण्यात येणार आहे. मथुरा कारागृहात फासावर चढविण्यासाठी ब्रिटिशकालीन व्यवस्था करण्यात आली आहे. याच ठिकाणी शबनम आणि तिच्या प्रियकराला फासावर चढविण्यात येईल. गेल्यावर्षी निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकविणारा मेरठचा जल्लाद शबनमलाही फासावर लटकविणार आहे. यासाठी त्याने दोनवेळी फाशीघराची पाहणी केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शबनम केलेले कृत्य हे खूपच क्रुर आहे. कोणाचाही थरकाप उडेल अशाप्रकारचे तिचे कृत्य असल्याने, तिची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अमरोहा येथे राहणारी शबनम हिने एप्रिल २००८ साली आपल्या प्रियकरासोबत मिळून ७ जणांची कुऱ्हाडीने हत्या केली होती. अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात १५ एप्रिल २००८ रोजी गावातील एका तरुणीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकूण नागरिक जमा झाले. ग्रामस्थ जेव्हा तिच्या घरी दाखल झाले तेव्हा परिवारातील सात जण रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले होते. अशा परिस्थितीत २५ वर्षीय शबनम ओरडून-ओरडून सर्वांना सांगत होती की, दरोडेखोरांनी तिच्या कुटुंबीयांची हत्या करुन फरार झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना शबनमवर संशय आला आणि त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. यानंतर तपासात संपूर्ण प्रकार पोलिसांच्या समोर आला.

पोलिसांच्या मते, २५ वर्षीय शबनम हिने आपल्या प्रियकरासोबत मिळून संपूर्ण घटना घडवून आणली. पोस्ट ग्रॅज्युएट आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या शबनमला पाचवी पास सलीमसोबत प्रेम झाले होते. मात्र, परिवारातील सदस्यांना हे मान्य नव्हते. याच दरम्यान शबनम गर्भवती झाली. यानंतर दोघांनी कुटुंबाची हत्या करण्याचा कट आखला. त्यानुसार, १५ एप्रिल २००८ रोजी शबनमने कुटुंबीयांच्या जेवणात औषध मिसळले आणि त्यानंतर सर्व बेशुद्ध झाले. मग, प्रियकरासोबत मिळून तिने कुटुंबातील एका-एक सदस्याची कुऱ्हाडीने हत्या केली.

पोलिसांनी आपल्या तपासानंतर शबनम आणि तिच्या प्रियकराला अटक केली. तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही जप्त केली. न्यायालयाने या प्रकरणात शबनम आणि सलीम दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. कारागृहात गेल्यावर सात महिन्यांनी गरोदर असलेल्या शबनम हिने एका मुलाला जन्म दिला. अनेक वर्षे हा मुलगा शबनम सोबत होता. २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यावर शबनम हिने या मुलाला आपल्या मित्र आणि त्याच्या पत्नीकडे सोपवले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.