Farmer Protest : शेतकरी साजरी करणार शिवजयंती, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत निर्णय

0

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची सर्वत्र तयारी केली जात असतानाच दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेले शेतकरी महाराजांची जयंती साजरी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने घेण्यात आला असून, देशभर जयंती साजरी केली जाणार आहे. 

बुधवारी सिंघू बॉर्डवर आयोजित संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत महाराष्ट्राचे समन्वयक संदीप गिड्डे यांनी १९ फेब्रुवारीला देशभरात संयुक्त किसान मोच्यातर्फे शिवजयंती साजरी करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला होता. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच १८ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी दुपारी १२ ते ४ पर्यंत रेल रोका करण्याची घोषणा केली आहे. अशात केंद्र सरकार तसेच पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. लवकरच राजस्थानमध्ये टोल मुक्ती आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही शेतकरी नेत्यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.