शेतकरी आंदोलन : बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट काय केले तर येथे कोणाकोणाला जाग यायला लागली : अजित पवार

माध्यमांशी संवाद, शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारवरही ओढले ताशेरे

0

पुणे : सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केले. कुणी थांबवलेलं होतं. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटले की, इथे भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिले गेले पाहिजे. ते त्यांचे मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथे कुणाकुणाला जाग यायला लागली. इथे कुणी थांबवले होते का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसले नाही. आपल्या नंदूरबारच्या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी थंडी असताना तिथं कुणी गेले नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केले नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केले हेही आपण पाहिले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या कला व क्रिडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा समाचार घेतला. 

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शेतकरी आंदोलनाबद्दल भाष्य केलं. यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही पवारांनी टीकास्त्र डागलं. अजित पवार म्हणाले, देशाच्या इतिहासामध्ये शेतकरी अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन करू पाहत आहेत आणि तुम्ही उलट खिळे मारताहेत. मारले की नाही, ही काय पद्धत झाली का? त्यातच अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडतात. ते समजू शकतो. कधी कधी पाण्याचे फवारे मारतात. बॅरिकेट्स लावता. सुरक्षा लावता, हेही आम्ही समजू शकतो. पण, तीन चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. बारा तेरा बैठका होऊन चर्चा निष्पळ होते. चर्चा करून विषय संपवायला काय होतं? याचा अर्थ पुढे मागे सरकण्याची तुमची (केंद्र सरकार) मानसिकताच नाही.  हा निर्णय शेतकऱ्यांना पटत नसेल, तर लाखांचा पोशिंदा मागणी करेलच.

शेतकरी आंदोलनाने देशातील चर्चेचं वर्तुळ व्यापून टाकले आहे. दिवसेंदिवस आंदोलन उग्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी बोलले जाऊ लागले आहे. पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केले होते. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. आजपर्यंत महाराष्ट्रातील किंवा देशातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर जेव्हा अन्याय झाला, तरच आंदोलन केलं. दुधाचे भाव पडले, तरच त्यांनी आंदोलन केलं. ऊसाचे दर घसरले. केळीबद्दल काही अडचणी आल्या, सोयाबीन, कापूस यांच्याबद्दल आल्या, तरच शेतकरी रस्त्यावर येतो. त्यातून राज्यकर्त्यांनी वेळोवेळी योग्य पद्धतीनं मार्ग काढला पाहिजे. चढउतार येतात. पण त्यातून कधी सवलत द्यायची असते, काही निर्णय घ्यायचे असतात. हे सगळं सोडून दिलं आणि खिळे मारताहेत. आता टीका व्हायला लागल्यावर काढत आहेत,” अशी टीका अजित पवारांनी मोदी सरकारवर केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.