Farmers Protest : फक्त एक फोन करा, मार्ग काढू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

चर्चेतून तोडगा निघेल, शांती हाच मार्ग

0

नवी दिल्ली :  तीन कृषी कायद्यांंविरोधात गेल्या ६६ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी प्रथमच भाष्य केले. शनिवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले. “केवळ एक फोन कॉल करा. त्या वेळी चर्चा करण्यासाठी मी उपलब्ध असेन,’ असे सांगून कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यामार्फत शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव पुन्हा देत आहे.

नव्या कायद्यांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. शेतकरी नेते काही निर्णयाप्रत अाले असल्यास पुन्हा चर्चेस तयार आहोत. सरकारने २२ जानेवारी रोजी दिलेला प्रस्ताव अद्यापही कायम आहे. कोणत्याही समस्येवर चर्चेद्वारेच तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले. २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारने ठेवलेल्या प्रस्तावानुसार नवे कृषी कायदे दीड वर्ष स्थगित ठेवले जातील त्यासोबतच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाबत तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली जाईल मात्र कृषिमंत्री तोमर यांचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी सिंघू आणि टिकरी सीमेवर झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ शनिवारी महात्मा गांधीजींच्या पुण्यातिथिनिमित्त आंदोलनकर्त्या शेकऱ्यांनी दिवसभर उपवास केला. केंद्र सरकारशी बोलणी करण्यासाठी शेतकरी पहिल्या दिवसापासूनच तयार आहेत, परंतु दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी योगेंद्र यादव यांनी यावेळी केली.

दरम्यान, प्रथमच पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी बोलण्याच्या तयारी दर्शविल्याने आता यावर तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र शेतकरी आंदोलनात फुट पाडून चर्चेचे आमंत्रण दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ही चर्चा खरोखरच सफल होईल काय, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.