सेलिब्रिटींनो जरा भान ठेवा… नाहीतर तुमचं तुणतुंण बंद पडेल, राजू शेट्टी संतापले!

सरकारी सवलतींना सोकावलेल्या सेलिब्रिटींनो जरा भान ठेवा... नाहीतर तुमचं तुणतुंण बंद पडेल, राजू शेट्टी संतापले!

0

कोल्हापूर : सध्या देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही शेतकरी आंदोलनावरून चांगलेच घमासान सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पापॅस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी शेतकरी समर्थनार्थ ट्विट करून एकच खळबळ उडवली होती. त्यामुळे देशात जोरदार रणकंदन सुरू झालं असून, कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आता त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काही सेलिब्रिटींनी भारताच्या अखंडतेवर भर देत इतरांनी यामध्ये बोलण्याचे कारण नसल्याचे सुनावले आहे. या सेलिब्रिटींच्या भूमिकेवरून सोशल मीडियावर त्यांना चागंलेच फैलावर घेतले जात आहे. आता यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उडी घेतली असून, या सेलिब्रिटींची चांगलीच कानउघडणी केली आहे.

राजू शेट्टी यांनी ट्विट करीत आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच सेलिब्रिटींनाही चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटींनो शेतकऱ्याला देशद्रोही ठरविताना जरा भान ठेवा. तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने आहेत हे विसरू नका, नाहीतर तुमचं तुणतुणं बंद पडेल ! राजू शेट्टींच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या सेलिब्रेटींविषयी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान रिहानाच्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भूमिकेनंतर ट्विट केले होते. भारतीय स्वतःचे प्रश्न सोडण्यास सक्षम असून, बाहेरच्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचा सूर सेलिब्रिटींनी लावला होता. सेलिब्रिटींच्या भूमिकेवर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.