Farmer Protest : मुख्यमंत्र्यांचा आदेश, संजय राऊत गाझीपूर बॉर्डरवर, वाचा सविस्तर!

शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पांठिबा

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी आता शिवसेना मैदानात उतरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना गाझीपूर बॉर्डरवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार खासदार राऊत गाझीपूर बॉर्डरवर जाणार आहेत. 

याबाबतची माहिती स्वत: खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी टिवटमध्ये लिहिले की, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुख-दुख:त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चेचा पहिला राउंड, दुसरा राउंड असे विक्रम करतेय. हा काही ऑलिम्पिक गेम सुरू आहे का? आशियाई गेम सुरू आहे का, खरेतर पहिल्याच दिवशी हा प्रश्न निकाली लागायला हवा होता. गेल्या ६० दिवसांपासून पंजाब, हरियाणाचा शेतकरी आंदोलन करत आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला फटकारताना संयशही व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.