Video : ‘फॅण्ड्री’तील जब्याच्या शालूचा ‘हा’ जलवा बघून तुम्हाला ‘परतीचा इंचू चावणारच’

0

मुंबई : फॅण्ड्री या नागराज मंजुळेच्या हिट चित्रपटात जब्याच्या शालूची भूमिका साकारणाऱ्या राजेश्वरी खरात हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फॅण्ड्रीमध्ये साधी भोळी दिसणारी शालू या व्हिडीओमध्ये चक्क मॉडर्न लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे.

शालू अर्थात राजेश्वरी खरातचा हा व्हिडीओ सध्या तुफान लाइक केला जात आहे. व्हिडीओमध्ये राजेश्वरीचा अंदाज खूपच हॉट दिसत आहे. सध्या तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धूम उडवून दिली असून, तिच्या चाहत्यांकडून तो तुफान लाइक केला जात आहे.

राजेश्वरीने फॅण्ड्री या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडेसोबत एका शाळकरी मुलीची भूमिका साकारली होती. फॅण्ड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर शालू कुठे आहे. अशी तिच्या चाहत्यांकडून विचारणा होत होती. मात्र जेव्हा तिने फॅण्ड्री हा चित्रपट केला तेव्हा ती इयत्ता नववीत शिकत होती.

राजेश्वरीची कुठलीही चित्रपट पार्श्वभूमी नाही. तिचे वडील बँकेत कामाला आहेत. तिचे शालेय शिक्षण पुण्यातील जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत झाले. ती फॅण्ड्रीच्या टीमला पुण्यात रस्त्यावर दिसली होती. टीमने तिला या चित्रपटाची ऑफर दिली.

राजेश्वरीने फॅण्ड्रीबरोबरच आयटमगिरी या चित्रपटातही काम केले आहे. सध्या राजेश्वरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून, तिचा हा मॉडर्न अंदाज चाहत्यांना भलतास पसंत येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.