महावितरणने विदर्भात सर्वाधिक कृषी पंपांना दिले वीज कनेक्शन

0

नागपूर : महावितरणने कृषी पंप धोरणानुसार गुरुवारपर्यंत विदर्भात (नागपूर प्रादेशिक विभाग) १५०८ कृषी पंपांना विजेचे कनेक्शन दिले आहे. सर्वाधिक ५०७ कनेक्शन नागपूर प्रदेशा देण्यात आले आहे. ऊर्जा विभागाच्या कृषी पंप वीजतोडणी धोरणानुसार प्रदेशात लघुदाब लाइनच्या वीज खांबावरून ६०० मीटर अंतरापर्यंत असलेल्या ७०८४ कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले आहे. 

महावितरणच्या अनुसार विदर्भात अकोला येथे २२८, अमरावती ४५९, चंद्रपूर १६२, गोंदिया १५२ आणि नागपूर विभागात ५०७ कनेक्शन देण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे १ एप्रिल २०१८ पासून कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्याची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यास गती देण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने धोरण जाहीर करण्यात आले. त्यानुसार शिल्लक रक्कमेतही सूट देण्यात येत आहे.

२६ जानेवारीला त्ययाचा प्रारंभ झाला. दोन दिवसात प्रदेशात एकूण ६०८४ कृषी पंपांना विजेचे कनेक्शद देण्यात आले आहे. सर्वाधिक ३७७१ कनेक्शन पुणे प्रादेशिक विभागात देण्यात आले. कोकण विभागात १४३३ आणि औरंगाबाद विभागात ३७२ कनेक्शन देण्यात आले आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.