नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा; देवेंद्र फडणवीसांविरुद्ध दाखल केली होती याचिका!

सकाळीच ईडीचे पथक सतीश उके यांच्या घरी पोहोचले

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क‍

नागपूर : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल करून चर्चेत आलेले नागपूरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळीच छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपूरातील घरी पोहोचले. यावेळी ईडीच्या पथकाने कसून तपास केला. दरम्यान, सतीश उके काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. त्यामुळे ही कारवाई सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली आहे. काही अधिकारी हे उके यांच्या घरी असून काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी उके यांच्या घरात दाखल असून सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सतीश उके यांच्या घराबाहेर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.