डाॅ. काजल पटणी यांचा एशिया पॅसिपीक एक्सलन्स अवॉर्डने गौरव

लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगिरीत केला सन्मान

0

नाशिक : एशिया पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा एशिया पॅसिफिक एक्सलन्स अवॉर्ड गीत योगा फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा स्पोर्ट योगा इंटरनॅशनलच्या चेअरमन डॉ. काजल पटणी यांना प्रदान करण्यात आला. ‘लाइफ टाइम ॲचिव्हमेंट’ या कॅटेगिरीत त्यांना हा अवॉर्ड प्राप्त झाला आहे.

एशिया पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आर्किटेक्चर, हेल्थकेअर आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्यांचा दरवर्षी या अवॉर्डने गौरव केला जातो. त्याचबरोबर सामाजिक कार्य, त्या-त्या क्षेत्राचा प्रचार, प्रसार व संशोधन याचाही विचार केला जातो. डॉ. काजल पटणी यांना योगा क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोवा येथे पार पडलेल्या या अवॉर्ड सोहळ्यात आशिया खंडातील किंगडम ऑफ टोंगा येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रिपू राजन सिन्हा आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे खजिनदार डॉ. आनंदेश्वर पांडेय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते त्यांना हा अवॉर्ड प्रदान करण्यता आला.

या पुरस्कारासाठी आशिया खंडातून अनेक नामांकने प्राप्त झाली होती. त्यात डॉ. पटणी यांची निवड करण्यात आली असून, नाशिकमधून हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या एकमेव ठरल्या आहेत. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या १२ व्यक्तींचा यथोचित गौरव करण्यात आला. प्रशस्तीपत्रक, मेडल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराबद्दल डॉ. काजल पटणी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.