शेतकऱ्यांना दारू, पैसा, तुप, भाज्या पुरवा पण आंदोलन जिवंत ठेवा, काँग्रेसच्या या महिला नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य!

0

हरियाणा : २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर काही शेतकऱ्यांनी आंदोलनाला हिंसक वळण दिल्याने, राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी झाली आहे. मात्र अजूनही काही शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघत आहे. आता हरियाणातील काँग्रेसच्या एका महिला नेत्याने या आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून देशातील राजकारण आणखी पेटविण्याचा प्रयत्न केल आहे. 

महिला काँग्रेसच्या नेत्या असलेल्या विद्या देवी यांनी शेतकरी आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना भाज्या, तुप, पैसा आणि दारू पुरवा असे वादग्रस्त आवाहन केले आहे. हरियाणातील जींदमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून हे आवाहन केले आहे. केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन हे तेवत ठेवायचं आहे. त्याला पुर्नजीवित करण्यासाठी शेतकऱ्यांना दारूसह पैसा पुरविण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना यासर्व गोष्टींची पूर्तता करा असे आवाहनच त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

या बैठकीला साफीदोनचे काँग्रेस आमदार सुभाष गांगोली आणि अन्य वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. दरम्यान विद्या देवी आपल्या भाषणात इतक्या वाहत गेल्या की, समोर मीडियाचे काही प्रतिनिधी बसलेले आहेत, याचेही त्यांना भान राहिले. मात्र उपस्थित अन्य नेत्यांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली की, मीडियाकडून त्यांचे भाषण रेकॉर्ड केले जात आहे, तेव्हा मात्र त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट झाली. त्यांनी लगेचच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्या देवी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.

नंतर त्यांनी केलेल्या आवाहनाची उकल करून सांगितली. दारू का पुरवली पाहिजे याचे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, आंदोलनाकडे प्रत्येक प्रकारची लोक आकर्षित होतात. त्यांना वेगवेगळया प्रकारच्या सुविधा हव्या असतात. आपल्याला वेगळया पद्धतीने आंदोलनाला बळकट करायचे आहे, असे विद्या देवी म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जींदमध्ये त्यांनी रॅलीची घोषणा केली. यामुळे काँग्रेसला दिशा आणि नवीन जीवन मिळेल. निवडणुकीतील पराभवानंतर आपण आपले अस्तित्व हरवून बसलो आहोत. शेतकऱ्यांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे आंदोलन पुनर्जीवित झाले आहे. आता आपल्याला ते चालवायचे आहे, असेही विद्या देवी म्हणाल्या.

मात्र सध्या त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. शेतकरी आंदोलनामागे काँग्रेसचाच हात असल्याच्या चर्चेला आता नव्याने सुरुवात झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.