दिलासा : पाचव्या दिवशीच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या आरोपातून मुक्त!

0

वाशिंग्टन : अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोगाचा सामना करावा लागणारे अमेरिकेचे माजी वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदाही महाभियोगाच्या आरोपातून मुक्तता झाली आहे. चार दिवस चालेल्या सुनावणीनंतर पाचव्या दिवशी घेण्यात आलेल्या मतदानातून त्यांना हा दिलासा मिळाला आहे. ६ जानेवारी रोजी कॅपिटल हिल येते भडकाऊ भाषण करून हिंसाचार घडवून आणण्याचा त्यांच्यावर आरोप होता. या आरोपातून अमेरिकेच्या सिनेटने त्यांना मुक्त केले आहे. 

१०० सदस्य असलेल्या सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ६७ मतांची गरज होती. मात्र पाचव्या दिवशी घेण्यात आलेल्या मतदानात ५७ सिनेट सदस्यांनी त्यांना दोषी मानले. तर ४३ सदस्यांनी त्यांना निर्दोष मानल्याने, त्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेच्या इतिहासात पदावरून पायउतार झाल्यानंतर दोनदा महाभियोगाचा सामना करावा लागणारे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत.  दरम्यान, बिल कॅसिडी, रिचर्ड बर्र, मिट रोमनी, सुसान कोलिन्स यांच्यासह अन्य सात रिपब्लिकच्या सदस्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात मतदान केले.

दरम्यान, या संपूर्ण आरोपातून मुक्त झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सर्वप्रथम कायदेतज्ज्ञांचे आभार मानले आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा कोणताही राष्ट्राध्यक्ष या परिस्थितून गेला नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. गेल्या ६ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी भडकाऊ भाषण दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलवर हल्ला चढविला होता. यावेळी झालेल्या हिंसाचारात ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पोलिसही जखमी झाले होते. आपल्या समर्थकांना उपसावल्याप्रकरणी त्यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला.

दरम्यान १८ डिसेंबर २०१९ मध्येही अमेरिकन सिनेटने त्यांच्यावर महाभियोग चालवला होता. फेब्रुवारी २०२० मद्ये त्यांची या आरोपातून मुक्तता झाली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.