डॅडी अरुण गवळीला कोरोनाचा विळखा, कारागृहातच उपचार सुरू!

0

नागपूर : नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन ऊर्फ डॅडी अरुण गवळी याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुण गवळीची प्रकृती ठिक नव्हती. त्यानंतर कोरोनाचे लक्षणे दिसू लागल्याने अरुण गवळीची कोरोना चांचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटीव्ह आल्याने कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आणखी काही कैद्यांची चाचणी केली असता, अरुण गवळीसोबत आणखी पाच कैदीही पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. सध्या कारागृहातच अरुण गवळीवर उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार अरुण गवळीला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्याची चाचणी केली असता, ती पॉझिटीव्ह आली. डॅडीसोबत इतरही चार कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या सर्व कैद्यांवर कारागृहातच कोरोनाचे उपचार केले जात आहे. सर्वांना स्वतंत्र जेलमध्ये ठेवण्यात आली आहे.

दरम्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.