Shocking : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेवरच डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न

राउंडवर असलेल्या डॉक्टरनेच महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे येत आहे

0

औरंगाबाद : महिलांवरील अत्याचाराच्या एकापाठोपाठ एक घटना समोर येऊ लागल्याने, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटील होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एकापाठोक एक महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्याने, या नराधमांचा कठोर बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबादमध्ये तर संताप आणणारी अन्‌ डॉक्टरी पेक्षाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संपात व्यक्त केला जात आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रात्रीच्यावेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरनेच महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे मोर आले आहे. या महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तेथून पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, आतापर्यंत या डॉक्टरवर काय कारवाई झाली, याची कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, संबंधित डॉक्टरला तातडीने बेड्या ठोकण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या कारवाईबाबत अद्यापर्यंत कुठलीही माहिती समोर येऊ दिली नाही. तसेच या डॉक्टरला केव्हा अटक केली जाईल, याबाबतही काहीच माहिती पुढे येत नसल्याने, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.