तुम्हाला झोपेत बोलायची सवय आहे काय?, तर हे आहेत त्यामागची कारणे!

0

लोकराष्ट्र : अनेक लोक झोपेत बोलतात, कदाचित तुम्हीही झोपेत बोलत असाल. खरं तर झोपेत बोलण्याची समस्या सामन्य समजली जाते. त्यामुळे या समस्येकडे फार लक्ष दिले जात नाही. अनेकजण याकडे सहजपणे दुर्लक्ष करतात. मात्र डॉक्टरांच्या मते या समस्येकडे अजिबातच दुर्लक्ष करायला नको. कारण झोपेत बोलण्याची सवयीचे पुढे स्लीपिंग डिसऑर्डर (Sleeping Disorder) या आजारात रुंपातर होऊ शकतो.

स्लीपिंग डिसऑर्डर या समस्येत लोक झोपेत स्वत:सोबतच गप्पा मारत असतात. दिवसभरात किंवा मागच्या काळात घडलेल्या काही घटनांचा संदर्भ त्यांच्या बोलण्यात असतो. त्यांचे हे बोलणे शेजारी बसलेल्या लोकांनाही स्पष्टपणे ऐकायला येते. ही समस्या शक्यतो वृद्ध आणि लहान मुलांमध्ये सर्वाधिक बघावयास मिळते. या त्रासाला पॅरासोमेनिया असेही म्हणतात. खरं तर याचे जरी काही साइड इफेक्ट्‌स होत नसले तरी, इतरांसाठी मात्र ही सवय डोकेदु:खी ठरू शकते.

डॉक्टरांच्या मते, यावर योग्य उपाय केल्यास या सवयीपासून कायमची सुटका मिळू शकते. त्याकरिता शरीर आणि मानसिकता सांभाळणे खूपच महत्त्वाचे असते. योग्य आहार आणि व्यायाम यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर तणावमुक्त राहणेही खूप महत्त्वाचे असते. कारण तुम्ही जर तणावात असाल तर त्याच गोष्टी तुम्ही झोपेत बोलू शकता. त्यामुळे तणावमुक्त राहणे खूप गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे झोपताना नेहमीच पाठीवर झोपायला हवे. पालथे झोपणे शक्यतो टाळावे. योग्य आहारावर लक्ष केंद्रीत करून शरीरास उपयुक्त  आहार घ्यायला हवा.

या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी नियमीत व्यायाम करणेही अत्यंत गरजेचे आहे. त्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते व अशा समस्या कमी उद्भवतात. त्याचबरोबर, आपले मन शांत ठेवावे. मानसिक स्वास्थ्य सांभाळणेही तितकेच महत्वाचे आहे. या सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही झोपेत बोलण्याच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.

काय आहेत याची लक्षणे? 

बदलती जीवनशैली, चुकीची आहारपद्धती , तणावग्रस्त जीवन, वाढत्या कामाचं ओझं, शारीरिक थकवा, अवेळी झोपणे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.