विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना पॉझिटिव्ह, दोनच दिवसांपूर्वी घेतली होती कोरोना लस

0

नाशिक : दोन दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतलेले नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना जिल्ह्यात पुन्हा एकदा डोके वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने त्यांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना लसीकरण केले जात आहे. सध्या शासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. दोन डोस असलेल्या या लसीचा पहिला डोस दोन दिवसांपूर्वीच आयुक्त गमे यांनी घेतला होता. मात्र अशातही त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, लस आणि रिपोर्ट यांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गमे यांच्यावर उपचार सुरू झाले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अधिकाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगण्याचीही गरज असल्याचे बोलले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.